आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • This Driver Was Carrying 28 Kindergarten Students In A Car

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांनी अडवली नर्सरीच्या मुलांची 7 सीटर, आतून निघाली इतकी मुले की मोजता-मोजता लागला दम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमध्ये प्री-स्कूलला जाणाऱ्या 7 सीटर कारचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ग्वांगक्षी प्रांतातील एका शहरात ट्रॅफिक पोलिसांनी क्षमतेपेक्षा जास्त चिमुकल्यांना घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरला अडवून त्यांची चौकशी केली. सुरुवातीला ड्रायव्हरने पोलिसांची माफी मागून सोडून देण्याची मागणी केली. परंतु, फाईन फाडण्यावर ठाम असलेल्या पोलिसांनी शेवटी त्या ड्रायव्हरला खाली उतरवले आणि एक-एक करून त्यातून उतरणाऱ्या चिमुकल्यांची मोजणी सुरू केली. फक्त 7 जणांना घेऊन जाण्यास सक्षम असलेल्या कारमधून एकानंतर एक तब्बल 28 चिमुकले बाहेर आले.


चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना 25 डिसेंबर रोजी घडली आहे. पोलिसांनी ड्रायव्हरची चौकशी केली असता संबंधित शाळेची बस आहे. परंतु, स्वस्त पर्याय म्हणून या मुलांच्या पालकांनी 7 सीटर कारला पसंती दिली. त्यातही या वाहनात मुलांना बसवण्याची कुठलीही मर्यादा ड्रायव्हरने पाळली नाही. ज्या ठिकाणी 10 मुलेही बसणे शक्य नाही तेथे या ड्रायव्हरने चक्क 28 मुलांना कोंबले. दरम्यान, पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले असून त्याचे वाहन सुद्धा जप्त करण्यात आले आहे.