A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: Illegal string offset 'level2_catname'

Filename: models/articles.php

Line Number: 34

This English Cricketer Gets 11 Lakhs For Doing Nothing | OMG: मॅचमध्ये फक्त मैदानात फिरण्याचे घेतले 11 लाख रुपये; वाचा कोण होता तो?
This English Cricketer Gets 11 Lakhs For Doing Nothing

OMG: मॅचमध्ये फक्त मैदानात फिरण्याचे घेतले 11 लाख रुपये; वाचा कोण होता तो?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 13, 2018, 01:01 PM IST

दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताचा 159 धावांनी पराभव झाला. पहिल्या टेस्टमध्ये भारताला इंग्लंडने 31 धावांनी पराभूत केले.

  • This English Cricketer Gets 11 Lakhs For Doing Nothing

    स्पोर्ट्स डेस्क - भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात इंग्लंडचा स्पिनर आदिल रशीदने बॅटिंग किंवा बॉलिंग सुद्धा केली नाही. तरीही आपल्या नावे विक्रमाची नोंद करून त्याने लाखो रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. रशीदचा इंग्लंडच्या विजयात काही वाटा नसला तरीही इंग्लंडच्या इतर बॉलर्सपुढे भारतीय फलंदाजांची एकही चालली नाही. दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताचा 159 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. पहिल्या टेस्टमध्ये सुद्धा भारताला इंग्लंडने 31 धावांनी मात दिली होती. आता इंग्लंडने टेस्ट सिरीझमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे.


    असा झाला आदिल रशीदचा रेकॉर्ड...
    टेस्ट टीमच्या 11 सदस्यांमध्ये सामिल असतानाही एकही चेंडू न टाकणारा आदिल अशा प्रकारचे 13 वा क्रिकेटर ठरला आहे. त्याने बॉलिंग आणि बॅटिंग तर सोडाच एखादा कॅच किंवा स्टम्पिंग सुद्धा केली नाही. रशीद बॅटिंगवर जाणार त्यापूर्वीच इंग्लंडने इनिंगची घोषणा केली. सोबतच वेगवान गोलंदाज भारताला नमवत असल्याचे पाहता इंग्लंडला स्पिनर रशीदकडे जबाबदारी देण्याची गरज वाटली नाही. त्यामुळे फक्त मैदानावर फिरण्यासाठी त्याने मॅच फी च्या स्वरुपात 12,500 पाउंड इतकी रक्कम घेतली. भारतीय चलनात ते 11 लाख 8 हजार रुपये होतात. रशीदपूर्वी अशा प्रकारचा अजब विक्रम करणाऱ्या खेळाडूंमध्ये पी. चॅपमन, बी व्हॅलेन्टाइन, बिल जोहान्सटन (दोनदा), कृपाल सिंग, एन कॉन्ट्रॅक्टर, सी. मॅकडर्मोट, आसिफ मुजतबा, एन मॅकेंझी, ए. प्रिन्स, जी बेट्टी, जे रुडोल्फ आणि रिद्धीमान साहा यांचा समावेश आहे.

Trending