आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'च्या या एक्स-कंटेस्टेंटचे वाद सहन करु शकली नाही आई, सोडले प्राण, स्वतः केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'बिग बॉस'चे 12 वे सीजन सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. याचा प्रोमो रविवारी रिलीज केला गेला. हा शो वादांसाठी ओळखला जातो. परंतू सीजन 11 मध्ये झालेला वाद याच्या एक्स-कंटेस्टेंटसाठी महागाचा ठरला. आम्ही जुबेर खानविषयी बोलत आहोत. तो दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा जावई आहे असे बोलले जाते. परंतू स्वतः जुबेरने स्पष्ट केले आहे की, तो हसीनाचा जावई नाही. शोमधून बाहेर पडल्याच्या जवळपास एकवर्षांनंतर जुबेरने समोर येऊन सांगितले की, 'बिग बॉस' मुळे त्याचे आयुष्य पुर्ण बदलले. 


जुबेर म्हणाला- शोमध्ये झालेल्या वादामुळे मी आईला गमावले 
- जुबेरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याची आई आता या जगात नाही. आपल्या मुलाच्या आयुष्यावर झालेला वाद ती सहन करु शकली नाही. जुबेरने सांगितले होते की, सलमान आणि त्याच्या टीम मेंबर्सने त्याला सांत्वना मॅसेजही दिला होता. याची त्याने स्तुती केली. स्वतः जुबेरने सांगितले की, तो बिग बॉसचा एक्स-कंटेस्टेंट एजाज खानसोबत चित्रपट करतोय. 

 

सलमानने स्वतः जुबेरला शोमधून केले होते बाहेर 
शोमध्ये एंट्री घेतल्यानंतर जुबेर खानने अर्शी खानसोबत गैरवर्तन केले होते. यामुळे सलमानने त्याला फटकारले होते. सलमान जुबेरला रागवून म्हणाला होता की, "घरातून बाहेर पडल्यानंतर तुला कुत्रा नाही बनवले तर माझे नाव सलमान खान नाही." यानंतर जुबेरने घरामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. त्याच्या अशा वागण्यामुळे शो मेकर्सने त्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी जुबेरने सलमानविरुध्द पोलिसात तक्रार दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...