आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांचा सामना केला या महिला साॅकर खेळाडूने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका : अमेरिकेच्या फुटबाॅल इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये ३४ वर्षांच्या साॅकर खेळाडू मेगन रेपिनाे यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या खेळाच्या बळावरच अमेरिकन साॅकर संघाला २०१५ व १९ मध्ये फिफा विश्वचषकावर नाव काेरता अाले. हा संघ बार अाॅलिम्पिकला जाऊन अाला असून २०१२च्या समर अाॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले अाहे. त्यांची एक खास गाेष्ट म्हणजे त्या लाेकांच्या हक्कासाठी संघर्ष करतात. फिफा या फुटबाॅलच्या अांतरराष्ट्रीय महासंघाने महिला व पुरुष फुटबाॅलमधील असमानतेच्या विराेधात मेगन यांनी सातत्याने अापला विराेध प्रकट केला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्याच्या विराेधातही त्या अावाज बुलंद करतात. त्यांचे हे वेगळे रूप २०११ मध्ये समजून अाले. २०११ च्या वर्ल्डकपमध्ये काेलंबियाच्या विराेधात गाेल केल्यानंतर तिने मैदानावरच मायक्राेफाेन खेचला अाणि ती ब्रूस स्प्रिंग्स्टन यांच्या अल्बममधील 'बाॅर्न इन द यूएस' गाणे गाऊ लागली. २०१९ मध्ये फिफा महिला विश्वचषक जिंकण्याच्या अाधीच मेगन यांनी त्यांचा संघ स्पर्धेत जिंकला तर ती व्हाइट हाऊसमध्ये जाणार नाही, अशी घाेषणा केली हाेती. त्यानंतर ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे मेगन यांचा निषेध केला हाेता. मेगनचा जन्म कॅलिफाेर्नियातील रेडिंगमध्ये झाला. वडील स्थानिक हाॅटेलमध्ये काम करायचे. मेगन म्हणते, तिचा भाऊ ब्रायन यांच्याकडून फुटबाॅल खेळण्याची प्रेरणा मिळाली. ब्रायन लहानपणी मेगनला खेळ शिकवताना खेळातील लहान लहान अाव्हाने द्यायचा. पण नंतर तिच्या भावाला अमली पदार्थांचे व्यसन लागले. कारचाेरी, हिट अँड रन प्रकरणी त्याला तुरुंगवास झाला. काही काळ अाधीच त्याची तुरुंगातून सुटका झाली. अापल्या भावाच्या परिस्थितीवर मेगन म्हणते, एखादी व्यक्ती व्यसनाधीन का हाेते यावर अापल्याला काम केले पाहिजे. अमली पदार्थाच्या सवयीच्या विराेधात लढण्याच्या अापल्या भावाच्या इच्छाशक्तीने मेगनला प्रभावित केले हाेते. मेगन स्पाेर्ट‌्स इलस्ट्रेडच्या (ईएसपीएन) स्विमसूट एडिशनमध्ये समलिंगी म्हणून फीचर हाेणारी ती पहिली महिला हाेती. महिला राष्ट्रीय बास्केटबाॅल खेळाडू स्यू बर्डबराेबर मेगन गेल्या तीन वर्षांपासून डेट करीत अाहे. मेगनची जुळी बहीण रेशन रेपिनाेदेखील समलिंगी अाहे. रेशलने मुलाखतीत सांगितले की, शाळेत शिकताना मेगनमध्ये अजिबात अात्मविश्वास नव्हता. तिला जेव्हा अापल्या शरीराबद्दल कळले, लैंगिकतेबद्दल समजले तेव्हा पुन्हा अात्मविश्वास निर्माण झाला.


जन्म- ५ जुलै १९८५
शिक्षण- पदवी, सोशलॉजी अाणि पॉलिटिकल सायन्स (युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टलँड)
विराेधासाठी राष्ट्रगीताच्या वेळी गुडघ्यावर बसली
२०१६ मध्ये फुटबाॅल खेळाडू काॅलिन केपर्निकला पाठिंबा देण्यासाठी गुडघ्यावर बसली मेगन रेपिनाे