आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे तरुणींना कर्जासाठी द्यावे लागतात नग्न फोटो; EMI चुकल्यास फक्त Viral नव्हे, करतात असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - अनेकवेळा आपल्याला हवी असलेली वस्तू खरेदी करण्यासाठी तेवढा कॅश नसतो. अशात ती वस्तू खरेदी करण्यासाठी सुलभ हप्ते किंवा कर्ज काढावे लागते. काही वेळा वैयक्तिक कारणांसाठीही कर्ज काढले जातात. त्यासाठी बँकेत काही कागदपत्रे आणि तारण जमा करावा लागतो. हे तारण आपली संपत्ती, नोकरीची पगारपावती किंवा बँक स्टेटमेंट काहीही असू शकते. परंतु, एक कंपनी अशीही आहे ज्यांची कर्ज देण्याची प्रक्रिया धक्कादायक आहे. ती कंपनी चीनची एक फायनान्स कंपनी आहे. 


तारण म्हणून घेतात न्यूड फोटो...
jiedaibao नावाची ही कंपनी प्रामुख्याने तरुणींना ऑनलाईन स्वरुपात कर्ज देते. त्यासाठी कुठल्याही रांगेत उभे राहण्याची किंवा एजंट पकडण्याची गरज नसते. ऑनलाईन अर्ज देऊन आपल्या मोबाईल बँकेतही पैसा मिळवता येतो. परंतु, यासाठी त्यांना गॅरंटी म्हणून स्वतःचे न्यूड फोटो कंपनीकडे गहाण ठेवावे लागतात. हे फोटो काढताना तरुणींना हातात आपल्या आयडी कार्ड आणि कर्जाच्या तपशीलासह पोझ द्यावे लागतात. जोपर्यंत कर्जाची परतफेड होणार नाही तोपर्यंत फायनान्स कंपनी हे फोटो स्वतःकडे ठेवून त्यांना ब्लॅकमेल करत असते. 


कारवाई ऐकूण बसेल धक्का...
ही कंपनी कर्जाचा हप्ता चुकवल्यास किंवा निश्चित वेळेच्या आत परतफेड न झाल्यास त्या फोटोंचा वापर करतात. सुरुवातीला तरुणींना त्यांचे फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. तरीही परतफेड होत नाही, तेव्हा ही कंपनी त्यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल करते. केवळ फोटो व्हायरल करून ते थांबत नाहीत. कंपनीकडे कर्ज घेणाऱ्या मुलींचे आई-वडील, नातेवाइक, काका-मामा आणि भाऊ-बहिणींसह मित्र-मैत्रिणींचेही नंबर असतात. त्या सर्वांना कपंनी हे नग्न फोटो त्या मुलींच्या सविस्तर माहिती आणि पत्त्यासह पाठवतात.

बातम्या आणखी आहेत...