Home | Khabrein Jara Hat Ke | This Fish Can Fly Up To 200 Meter Named Flying Fish

PHOTOS: हा आहे हवेत उडणारा फ्लाइंग फिश, 400 मीटरपर्यंत भरतो उड्डाण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:28 AM IST

फ्लाइंग फिश म्हणजे उडणारा मासा. तुम्ही कधी उडणारा मासा पाहिला आहे का? कदाचित नाहीच.

 • This Fish Can Fly Up To 200 Meter Named Flying Fish
  200-400 मीटरपर्यंत हवेत उडणारा फ्लाइंग फिश

  न्यूयॉर्क- फ्लाइंग फिश म्हणजे उडणारा मासा. तुम्ही कधी उडणारा मासा पाहिला आहे का? कदाचित नाहीच. आम्ही तुम्हाला आज असा मासा दाखवत आहोत, जो केवळ पाण्यातच नव्हे तर हवेतसुध्दा उडू शकतो. हे ऐकण्यास थोड विचित्र वाटते, मात्र हे सत्य आहे. हा मासा हवेत उडतो. तब्बल 200 ते 400 मीटर उडण्याची त्याची ताकद आहे. आकाराने 45 सेमीचा हा मासा पाण्यात गतीने चालतो आणि पाण्याच्या खोलात जाताच पंख पसरतो.

  काही सेकंद पाण्यावर तरंगून हा मासा हवेत उडायला लागतो. या माशाने हवेत उडण्याच्या या कौशल्यामुळे स्वत:ला शिकार माशांपासून वाचवले आहे. जेव्हा सॉर्ड फिश, टूना, मॅकेरेल आणि मर्लिनसारख्या शिकारी मासे फ्लाइंग फिशवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा मासा जवळपास 60 किमी/तासाच्या वेगाने पाण्यावर तरंगून पंख पसरून हवेत उड्डाण घेतो.

  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या या फ्लाइंग फिशविषयी आणि पाहा खास Photos...

 • This Fish Can Fly Up To 200 Meter Named Flying Fish

  आकाराने लहान आणि हलकी असल्याने उडू शकतो हवेत- 

   

  आकाराने केवळ 18 इंच (40 सेमी) हा मासा वजानानेसुध्दा हलका असतो. छोट्या आकारासोबत या माशाचे पंख मोठे असतात. शरीराच्या अशा रचनेमुळे मासा गतीने पाण्यावर तरंगून पंख पसरू शकतो. हवेत उडण्याच्या या कौशल्यामुळे ती शिकार करणा-या माशांपासून वाचतो.  

   

  पुढे वाचा, शिकारी माशांपासून वाचण्यासाठी किती सामर्थ्यशाली बनला हा मासा... 

 • This Fish Can Fly Up To 200 Meter Named Flying Fish

  फ्लाइंग फिश स्वत:मधील हा अनोखा गुण शिका-यांपासून वाचण्यासाठी उपयोगात आणतो.  सॉर्ड फिश, टूना, मॅकेरेल आणि मर्लिनसारख्या शिकारी माशांपासून वाचण्यासाठी फ्लाइंग फिश हवेत उडू लागतो. शिकार करणारे मासे याच्यावर हल्ला करताच तो गतीने हवेत उडान भरतो. त्यामुळे शिकारी मासे त्याची शिकार करण्यात अपयशी ठरतात. 

Trending