आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फळाचा वास आहे जगात सर्वात घाणेरडा, घाण मोजे किंवा ड्रेनेजसारखा दुर्गंध, तरीही म्हणतात \'किंग ऑफ फ्रूट्स\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - दक्षिण आशियाच्या अनेक देशांमध्ये जगातील सर्वात घाणेरडा वास असलेले फळ आढळते. त्याचे नाव 'ड्युरियन' आहे. याला येथे 'किंग ऑफ फ्रूट्स' (फळांचा राजा) नावानेही ओळखले जाते. हे फळ खाणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, यातून घाणेरड्या नाल्यासारखा किंवा मोजांसारखा दुर्गंध येतो. अत्यंत घाणेरडा वास असल्याने अनेक देशांत प्रवासात हे सोबत ठेवणे बॅन आहे. पण असे असले तरील यातील गुणांमुळे ते अत्यंत महागडे विकले जाते, त्यासाठी येथे खास व्यवस्था असते. 


अनेक देशांत प्रवासावर बंदी 
- 'ड्युरियन' नावाचे हे फुल आशियामध्ये इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशियामध्ये आढळते. आकारात ते रग्बी बॉल सारखे असते. बाहेरून काटेरी आणि प्रचंड दुर्गंधीयुक्त असे हे फळ असते. याचे वजन 1 किलो ते 6 किलोपर्यंत असू शकते. ते अत्यंत महागडे असते. 
- ज्या दुकानांमध्ये या फळाची विक्री केली जाते, त्याठिकाणीही यासाठी खास व्यवस्था असते. त्याठिकाणी काचेच्या बॉक्समध्ये सॅटिनच्या कापडावर हे ठेवले जाते. या फळातून घाणेरडे मोजे किंवा अत्यंत घाणेरड्या नाल्यासारखा वास येतो. त्यामुळे बहुतांश लोकांना हे खायला आवडत नाही. तसेच जे खातत तेही याबाबत कोणाला सांगत नाहीत. 
- काही लोक खाऊनही सांगत नाहीत, तर काही लोक हे खाताना सेल्फी क्लिक करतात. लोक सोशल मीडियावर आपण किती मोठे काम करत आहोत असे फोटोद्वारे दाखवत असतात. आपसांत हे फळ खाण्याचे डेअरींग चॅलेंजही दिले जाते. हे फळ साऊथ एशियामध्ये किंग ऑफ फ्रूट्स म्हणून ओळखळे जाते. 
- विचित्र वासाशिवाय हे फळ त्याच्या गुणांसाठीही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. याच्यात आयरन, व्हिटामिन-सी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळते. इंडोनेशियामध्ये या एका फळाची किंमत 500 डॉलर म्हणजे सुमारे 36 हजार रुपयांपर्यंत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...