आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या खूप पूर्वी या भारतीय तरुणीने पाच वर्षांपूर्वीच केला होता समलैंगिक विवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी आपसांत सहमती असल्यास ठेवलेल्या समलैंगिक संबंधांना मान्यता दिली आहे. मात्र अद्याप समलैंगिक विवाहाला मान्यता दिलेली नाही. मात्र असले असले तरी एका भारतीय तरुणीने पाच वर्षांपूर्वीच अमेरिकेत मैत्रीणीबरोबर समलैंगिक विवाह केला होता. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 


शेनॉन पॉल आणि सीमा यांनी प्रथम फिटनेस क्लासमध्ये एकमेकिंना पाहिले तेव्हाच त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघींनीही जून 2013 मध्ये समलैंगिक विवाह केला होता. अमेरिकेच्या इतिहासात हा पहिला भारतीय समलैंगिक विवाह होता. त्यावेळी या विवाहाची फारशी चर्चा झाली नव्हती. पण नंतर या दोघी प्रसिद्धी झोतात आल्या. या दोघींना एक बाळही आहे. 

 

या दोघींनी फेसबूकवर फोटो शेअर केल्यानंतर भारतीय माध्यमांध्ये त्यांच्या विवाहाची आणि फोटोंची चर्चा झाली होती. या दोघींनीही हिंदु परंपरेनुसार विवाह केला होता. या विवाह सोहळ्यात डोली, मेंदी, फेरे सर्वकाही भारतीय परंपरेनुसार झाले होते. त्याचबरोबर किस, वाइन, डान्स आणि रिंग सेरेमनीद्वारे अमेरिकन संस्कृतीचे दर्शनही घडले होते. शेनॉन आणि सीमा एकमेकिंना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात. शेनॉन सांगते की, ती प्रथम सीमाला एका बूट कँप फिटनेस क्लासमध्ये भेटली होती. ती क्लासमध्ये टिचींग करायची. त्यानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला होता. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, शेनॉन आणि सीमा यांच्या विवाहाचे फोटो, अखेरच्या स्लाइड्वर पाहा त्यांच्या बाळाचा फोटो... 

बातम्या आणखी आहेत...