Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | This is first whats app election in India

ही भारताची पहिली व्हाॅट्सअॅप निवडणूक; केंद्रापर्यंत पोहोचवताय हा एकच संदेश

कावेरी बामजई | Update - Apr 20, 2019, 09:02 AM IST

केंद्रापर्यंत एकच संदेश-मतदारांवर छाप पाडण्यासाठी व्हाॅट्सअॅप करा

  • This is first whats app election in India

    विश्लेषण - जानेवारीत व्हाॅट्सअॅपने एकत्र मेसेज फाॅरवर्ड करण्याची मर्यादा ५ केली तेव्हा व्हाॅट्सअपला सर्वात आधी निवडणूक शस्त्र म्हणून वापरणारा भाजप मुळीच चिंतित नव्हता, कारण आताही तो पाच ग्रुपमध्ये (प्रत्येक ग्रुपमध्ये २५६ सदस्य असू शकतात) पाठवून १२८० लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जर हाच संदेश त्याच्या १०,००० कार्यकर्त्यांनी पुढे पाठवला तर एक कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतो.


    त्यामुळे राज्य आणि जिल्ह्यापासून केंद्रापर्यंत २०१९ चा एकच संदेश आहे-मतदारांचा मेंदू हॅक करण्यासाठी व्हाॅट्सअॅपचा वापर करा. भाजपच्या एका ज्येष्ठ रणनीतिकारानुसार,व्हाॅट्सअॅपला ट्रेस केले जाऊ शकत नाही, ते प्रमाणित केले जाऊ शकत नाही आणि ते कोणतेही नेटवर्क भेदू शकते. व्हाॅट्सअॅपच्या २० कोटी युजर्समुळे एकाच वेळी मोठ्या गटापर्यंत पोहोचणे सोपे आहे. ते त्यामुळे ही निवडणूक पहिली व्हाॅट्सअॅप निवडणूक झाली आहे.

    कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीत भाजपने व्हाॅट्सअॅपच्या प्रभावाचे बारकाईने मूल्यमापन केले. चिथावणीखोर बातम्यांचा प्रभाव सर्वाधिक आहे. त्यात एक मोठा भाग राहुल यांच्यावरील विनोदांचा होता. अलीकडेच काँग्रेसने किमान उत्पन्न योजनेची घोषणा केली तेव्हा व्हाॅट्सअॅपवर फाॅरवर्ड होणारे संदेश या योजनेच्या अटींवर केंद्रित झाले. उत्तर प्रदेशच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला ‘मोदींना रोखण्यासाठी देशातील मुस्लिम एकजूट होत आहेत,’ हा संदेश चालला. त्यानंतर या संदेशांत जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम आघाडीबद्दल बोलले जाऊ लागले आणि म्हटले जाऊ लागले की, कशा प्रकारे ३५ कोटी मुस्लिम ना शिया-सुन्नीत विभागले आहेत ना देवबंदी-बरेलवीत. गुजरातपासून मोदींना पाहत असलेले राजकीय विश्लेषक अरविंद बोसमिया म्हणाले की, ते कोणतीही नवी आणि सर्वात चांगली गोष्ट पटकन आत्मसात करतात. मोदींच्या मतपेढीचा मोठा भाग स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा आहे. त्यात व्हॉट्स्ॅप हे मत बनवणे आणि मत जमवणाऱ्यांचे प्रमुख साधन आहे. हा गट आरएसएसशी नाही, तर मुस्लिम विरोधाने प्रेरित आहे. मोदींवर जेवढे कथित धर्मनिरेपक्ष टीका करतात, हा गट तेवढाच त्यांना पाठिंबा देतो. काँग्रेस पक्षही दिव्य स्पंदनामार्फत या खेळात उतरला आहे. आता भाजपचा जाहीरनामा जारी होताच त्याची पॅरडी बनवणे असो किंवा मेरठच्या उमेदवाराच्या,‘कमळ,कमळ,कमळ...’ या आवाजासह हिटलरचे फुटेज जोडणे असो, हे वेगाने होते.

Trending