Home | Gossip | This Is How Much Parineeti Chopra Demanded From Nick Jonas For Joota Chupai Ceremony

बहीण प्रियांकाच्या लग्नात बूट लपवण्याच्या विधीवेळी मिळालेल्या पैशांसंदर्भात परिणीतीने सोडले मौन, म्हणाली - निक मोठा दिलदार माणूस आहे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 11:56 AM IST

परिणीती म्हणाली होती - मी बूट परत करण्याच्या मोबदल्यात 37 कोटी रुपयांची मागणी करणार आहे...

  • This Is How Much Parineeti Chopra Demanded From Nick Jonas For Joota Chupai Ceremony

    मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नात परिणीती चोप्राने निक जोनासचे बूट परत करण्याच्या मोबदल्यात त्याच्याकडे 5 लाख डॉलर अर्थातच 3.5 कोटींची मागणी केली होती. तर काही रिपोर्ट्सनुसार, ही रक्कम 5 कोटी असल्याचेही सांगितले जाते. पण आता स्वतः परिणीतीने याविषयीचे मौन सोडले आहे. जे तर्कवितर्क लढवले जात आहेत, त्याविषयी परिणीती म्हणाली, लोक रकमेविषयी जुकीचा अंदाज बांधत आहेत.

    परिणीतीने लिहिले - निक यापेक्षाही क्रेजी आणि मोठा दिलदार निघाला...

    - परिणीतीने लिहिले, "जे लोक मी निककडून किती रुपये घेतले याविषयी अंदाज बांधत आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की त्यांना याविषयी काहीही माहित नाही. मी फक्त एवढेच सांगेल, की तुम्ही जे काही अंदाज बांधत आहात, ते सपशेल चुकीचे आहेत... हाहाहा.. निक यापेक्षाही क्रेझी आणि मोठा दिलदार िनघाला. ते क्षण आताही माझ्या डोळ्यांसमोर येत आहेत. खरंच काय क्षण होते ते..."

Trending