आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Is How To Attain Salvation: 3 5 Years After Death, Record The Berth Of The Train And Bring It To The Ancestors To Bring It To The Body.

अशी होते मोक्षप्राप्ती : निधनानंतर १०-१२ वर्षांनी रेल्वेत बर्थ नोंदवून पिंडदानासाठी पितरांना गयेपर्यंत आणतात, श्रद्धापूर्वक होते पिंडदान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंजन सिन्हा 

गया - पितरांच्या नावे रेल्वेत बर्थचे आरक्षण होते. बर्थवर व्यक्ती नसते तर  पितृदंड असताे. मुलांसारखा सांभाळ करत पितृदंड रिकाम्या बर्थवर ठेवलेल्या असतात. पिंडदान करणारे व पालक वाटेत जिवंत व्यक्तीप्रमाणे पितृदंडाचे स्वागत होते. जेवताना आधी पितरांना भोजन दिले जाते. रात्री त्यांना झोपण्याचे आवाहन करतात. नातेवाइक रेल्वे जागरण करत, या बर्थवर अन्य प्रवासी कोणी बसू नये म्हणून अस्थीचे रक्षण करत असतात. गयेत पितृदंडावर श्राद्ध व पिंडदान करण्याची ही अनोखी परंपरा आहे. ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील भाविकांत ही प्रथा सर्वाधिक प्रमाणात प्रचलित आहे. महाराष्ट्रातही पितृपक्षाचे महत्व असून पितरांना मोक्ष मिळावा म्हणून काशी व गयेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. 
 

स्मशानातील माती, ७ पेरांचा दंड व नारळापासून होतो पितृदंड
सात पेराचा हिरवा दंड (बांबू)  नारळ व पितरांचे जेथे अंत्यसंस्कार झालेले आहेत तेथील माती एका स्वच्छ कापडात गुंडाळलेली असते. सात दिवसांपर्यंत भगवद्गीतेचे पारायण केले जाते. सर्व पितरांना अाव्हान करून त्या दंडात त्यांचे अस्तित्व निर्माण केले जाते. या अनुष्ठानात क्रमाक्रमाने हिरवा बांबू जागोजागी फाटलेला असतो. ही प्रक्रिया पूर्ण होताच पितरांचा यात निवास हाेतो, अशी मान्यता आहे. 
 

पहिले रेल्वे आरक्षण पितरांच्या नावे
ओडिशातील ३० सदस्यांसोबत सुशीलकुमार मित्तल पितृदंडासह येथे आले आहेत. छत्तीसगडचे सरगुजा सुभाष अग्रवाल कुटुंबातील १२ सदस्यांसह येथे आले आहेत.  सुभाष अग्रवालसोबत आलेले कृष्णकुमार अग्रवाल यांनी म्हटले, प्रवासात पितृदंडाच्या बाबतीत अनेक वेळा त्यांच्या बर्थच्या आरक्षणाबद्दल टीटीईला समजून सांगावे लागले. रायपूरहून पुढील प्रवासात मात्र टीटीईला याची कल्पना असल्याने पुढे फार त्रास झाला नाही. अनेक टीटीईंना पितृदंडाचे महत्त्व माहिती आहे. ते १५ दिवसांत काही सूटही देतात. सीट आरक्षित असेल  व ते रिकामे असेल तर बसण्याची परवानगीही देतात. राजस्थानातील भाविक आले आहेत.