आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाज फायनान्सच्या एफडीने अशा प्रकारे ग्रो करता येतील आपल्या सेव्हिंग्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो रेटमध्ये 0.35 टक्के कपात केली. त्यामुळे, रेपो रेट 9 वर्षांतील सर्वात निचांकी 5.40% वर येऊन ठेपला आहे. परिणामी वित्तीय संस्थांना सुद्धा एफडी अर्थात फिक्स डिपॉझिटचे व्याजदर जवळपास 0.75% टक्क्यांनी कमी करावे लागले. त्यातही नवीन दर लागू झाल्यानंतर यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.  अशात किफायतशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बजाज फायनान्संचे फिक्स डिपॉझिट उत्तम पर्याय ठरू शकते. यातून जवळपास 8.95% पर्यंतचे व्याजदर मिळू शकतील. ज्यादा व्याजरांसह बजाज फायनान्समध्ये आपल्याला सुलभ अॅप्लिकेशन आणि विश्वासार्हतेसह अनेक सुविधा मिळतील. सद्यस्थितीला सर्वोत्तम एफडीच्या शोधात असाल आणि आधीपासूनच कस्टमर आहात तर आपण ऑनलाइनच्या माध्यमातून सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. काय आहे बजाजची ऑनलाइन एफडी आणि कसे कराल गुंतवणूक सविस्तर जाणून घ्या.

सुलभ ऑनलाइन एफडी
अनेकदा गुंतवणूक करण्यासाठी होणाऱ्या किचकट प्रक्रियेमुळे आपण गुंतवणूक करणे टाळत असतो. परंतु, बजाज
फायनान्सने आपल्यासाठी हे काम अतिशय सुकर आणि अवघ्या काही मिनिटांत शक्य बनवले आहे. केवळ काही
क्लिक करून आपण गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.
 
सुलभ गुंतवणूक
ऑनलाइनच्या माध्यमातून एफडी काढणे अतिशय सोपे आणि सुलभ बनले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला
कुठल्याही प्रकारच्या कागदांची गरज नाही. घर किंवा ऑफिस अशा कुठूनही आपण ही गुंतणूक करू शकता. यासाठी
कागदपत्रांच्या झेरॉक्स किंवा स्कॅन कॉपीची चिंताच नको. त्यामुळे, बजाज फायनान्समध्ये आपण कुठूनही आणि
कधीही गुंतवणूक करू शकता.
 
कागदपत्रांशिवाय करा गुंतवणूक
आपण पूर्वीपासूनच बजाज फायनान्सचे कस्टमर आहात तर आपल्याला ऑनलाइन एफडी उघडण्यासाठी कुठल्याही
स्वरुपाची कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होईल. या व्यतिरिक्त
बजाज फायनान्स आपल्यासाठी मल्टी-डिपॉझिटसह गुंतवणुकीचे अनेक पर्याय घेऊन आले आहे. यात एकाच चेकच्या
माध्यमातून आपल्याला वेग-वेगळी रक्कम विविध ठिकाणी डिपॉझिट करता येईल. काही ठराविक भागांमध्ये
आपल्याला डेबिट कार्डच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची देखील सुविधा आहे.
यासोबतच, इतर अनेक सुविधांमुळे बजाज फायनान्सची एफडी आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. जाणू घ्या,
काय आहेत हे पर्याय...

जास्त व्याजदर
बजाज फायनान्सच्या विद्यमान ग्राहकांना एफडींवर 8.85% पर्यंत व्याजदर मिळू शकतील. यात ज्येष्ठ नागरिकांना
8.95% व्याजदर आणि नवीन ग्राहकांना 8.60% पर्यंत व्याज दिला जातो. हे सर्वच व्याजदर किमान 3
वर्षांसाठीच्या एफडीवर लागू होतील. एफडींवर 1 ते 3 वर्षेदरम्यान किती व्याजदर मिळू शकतील यावर एक नजर –

ग्राहकांचे प्रकारडिपॉझिट
(रुपयांत)
कालावधी
(वर्षांमध्ये)
व्याजदर
(टक्क्यांमध्ये)
व्याजातून कमाई
(रुपयांत)
मॅच्योरिटीवर
(रुपयांत)
नवीन1,00,00038.628,0821,28,082
विद्यमान1,00,00038.8528,9691,28,969
ज्येष्ठ नागरिक1,00,00038.9529,3251,29,325

स्थैर्य आणि विश्वासार्हता
बजाज फायनान्सला स्थैर्याच्या बाबतीत सर्वात चांगल्या प्रदर्शनासाठी CRISIL मध्ये FAAA आणि ICRA मध्ये
MAAA रेटिंग्स मिळाल्या आहेत. त्यामुळे, आपला पैसा आणि गुंतणूक सुरक्षित हातांमध्ये असल्याची खात्री करून
घेण्यास हरकत नाही. त्यातही आतापर्यंत बजाज फायनान्सच्या एफडीवर 1,38,000 एफडीधारकांनी विश्वास
दाखवला आहे. यातून सर्वात सुरक्षित गुंतवणुकीसाठी बजाज फायनान्सची विश्वासार्हता सिद्ध होते.

गुंतवणुकीचा लवचिक कालावधी
बजाज फायनान्सच्या एफडीसाठी आपण आपल्या सुविधेनुसार 1 ते 5 वर्षे असा कुठलाही पर्याय निवडू शकता.
जेवढा जास्त कालावधी तेवढाच फायदा यातून मिळवता येईल. ही बाब समजून घेण्यासाठी गृहित धरा की आपण 5
लाख रुपयांची एफडी केली. तर आपल्याला 1 ते 2 आणि 3 वर्षांत किती नफा होऊ शकतो.

डिपॉझिट
(रुपयांत)
कालावधी
(वर्षांमध्ये)
व्याजदर
(टक्क्यांमध्ये)
व्याजातून कमाई
(रुपयांत)
मॅच्योरिटीवर
(रुपयांत)
5,00,0001840,0005,40,000
5,00,00028.1584,8215,84,821
5,00,00038.61,40,4126,40,412

अतिरिक्त फायदे
ऑटो रिन्युवलसारख्या फीचरमध्ये बजाज फायनान्स आपल्याला गुंतवणुकीची सवय लावण्यात मदत करेल. हा
पर्याय आपण एफडी निवडतानाच जोडू शकता. यानंतर आपल्याला पुढील गुंतवणुकीसाठी कुठल्याही प्रकारचे
अतिरिक्त फॉर्म भरावे लागणार नाही. सोबतच, गुंतवणुकीच्या काळात आपल्याला पैशांची गरज भासल्यास आपण
यातून 4 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देखील काढू शकता. यासाठी संपूर्ण एफडी काढून घेण्याची गरज नाही. या सर्वच
सुविधा त्वरीत उपलब्ध असल्याने बजाज फायनान्सची एफडी आपल्या गुंतवणुकीच्या सर्वच गरजा पूर्ण करू शकते.
त्यामुळे, आपल्या सेव्हिंग्स सर्वात सुरक्षित पद्धतीने वाढवण्यासाठी लवकरात-लवकर बजाज फायनान्सची ऑनलाइन
एफडी करायला विसरू नका.
यासंबंधित अधिक माहितीसाठी क्लिक करा.
 

बातम्या आणखी आहेत...