आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2020 मध्ये अशा प्रकारे बदलेल तुमचा स्मार्टफोन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या वर्षात स्मार्टफोनमध्ये बरेच बदल होणार आहेत. 2019 मध्ये फोल्डेबल फोनची भरपूर चर्चा झाली. 2020 मध्ये 5 जी व ऑप्टिकल झूमकडे अधिक कल…

1. २०२० मध्ये ५ जी वेगाने पसरेल व अनेक स्वस्त फोनमध्ये ५ जी सेवा उपलब्ध असेल. मोटोरोला, ओप्पो, शाओमीने ५ जी फोन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली आहे. सध्या ७० हजारपेक्षा कमी किमतीचे थोडेच ५जी फोन आहेत.

2. गेमिंग कन्सोलचे नवीन जनरेशन पुढच्या वर्षी येणार आहे. अशा वेळी गेम प्लॅटफॉर्मचा विस्तार होईल. गेमिंग कन्सोलपर्यंत मर्यादित आणखी काही गेम्स मोबाइलवर येतील. २०१९ मध्ये पबजी, फोर्टनाइट बॅटल रॉयल व कॉल ऑफ ड्यूटीसारखे गेम मोठ्या प्रमाणात मोबाइलवर खेळले जात होते.

3. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांमध्ये अजूनही बरीच क्षमता आहे. २०१९ मध्ये बरेच फ्लॅगशिप फोन 2x ऑप्टिकल झूमपुरते मर्यादित होते. नवीन वर्षात फ्लॅगशिप फोन या अडथळ्यांवर मात करतील. हुवावे, सॅमसंग आणि अॅप्पल यांच्या फ्लॅगशिपमध्ये किमान 10x असणे अपेक्षित आहे.

4. २० ते ३० हजारांचे फोन्स नवीन वर्षात येतील अशी अपेक्षा आहे. या विभागात रिअलमी आणि व्हिवोसारख्या कंपन्या वाढतील. कंपन्या २० हजारांच्या किमतीत सर्वोच्च वैशिष्ट्ये देतील, ज्यामुळे १० ते १५ हजारांच्या किमतीत अडकलेल्या ग्राहकांना आणखी काही पैसे खर्च करण्याचे साहस मिळेल.

5. नवीन वर्षात लिथियम-आयन बॅटरीचा वापर वाढेल. सॉलिड इलेक्ट्रोडसह या बॅटरीचे आयुष्य जास्त असेल - आपल्या फोनच्या सध्याच्या बॅटरीपेक्षा पाचपट जास्त. या बॅटरीज उच्च तापमानातदेखील चांगले कार्य करू शकतील. एकदा चार्ज केल्यास दहा दिवस फोन चालू ठेवण्यास सक्षम असतील.

बातम्या आणखी आहेत...