आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे नॉर्वेतील 'सुलभ शौचालय' व्हायरल झालेल्या फोटोंवर लोकांना विश्वास बसेना...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : फोटोमध्ये दिसत असलेले हे वेव-शेप्ड स्ट्रक्चर पाहून तुम्हाला काय वाटते आहे ? काचेचा दरवाजा असलेले डोंगरांजवळच्या रस्त्यावर बनलेले हे स्ट्रक्चर इतर काही नाही तर पब्लिक टॉयलेट आहे. हे आलिशान दिसणारे कॉटेज टाइप रूम टॉयलेट आहे, ज्याचा वापर रस्त्यावरून जाणारे लोक येता जाता करतात. नॉर्वेमध्ये असलेल्या यूरेडप्लासेन नावाच्या जागेवर हे रेस्टरूम बनवले गेले आहे. येथे बसून लोक समुद्र आणि डोंगरांचे सुंदर दृश्य पाह शकतात. टूरिस्ट जेव्हा डोंगरांजवळ पिकनिकसाठी किंवा फिरण्यासाठी येतात तेव्हका या ठिकाणी नक्की थांबतात. येथे ते फ्रेश होण्याबरोबरच आजूबाजूच्या सुंदर दृष्यांचाही आनंद घेतात.  

या वॉशरूमच्या बाहेर मार्बलचे बेंचदेखील बनवले गेले आहेत. जिथे लोक बसतात. थंडीमध्ये येथील दृश्ये शानदार दिसते. नॉर्वेमध्ये यूरेडप्लासेन एक मेमोरियल जागादेखील आहे. कारण दुसऱ्या विश्व युद्धादरम्यान "यूरेड" नावाचे सबमरीनची फुग्लोजॉर्डनमध्ये असलेल्या खदानीशी टक्कर झाली होती. ज्यामध्ये 42 जवानांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ डोंगरावर त्यांची नावेही लिहिली गेली आहेत.  

हे पब्लिक रेस्ट रूम ह्यूजेन/जॉहर आर्किटेक्टने बनवले आहे. एवढेच नाही या बाथरूमचे वैशिष्ठ्य हे आहे की, बाहेर जेवढा अंधार असेल, याच्या आतील लाईट तितकेच चमकदार राहतात. तसेच हे वॉशरूम व्हीलचेअरवर बसलेले लोकही वापरू शकतात. 

#ureddplassen #gildeskål #utedo

A post shared by Tommy Iversen (@tommiver) on

बातम्या आणखी आहेत...