Home | International | Other Country | This is the germenies bastai rocks

फोटोग्राफी... गड-किल्ल्यांसारखे भासणारे जर्मनीतील उंच चुनखडक, १० लाख वर्षांपूर्वी क्षरण प्रक्रियेतून निर्मिती

वृत्तसंस्था | Update - Apr 17, 2019, 09:34 AM IST

१६८ वर्षांनंतर तो आजही दिमाखात उभा आहे

  • This is the germenies bastai rocks
    हे छायाचित्र पाहून एखाद्या भक्कम गड-किल्ल्याची ही तटबंदी असावी, असे वाटते. पण या इमारती नसून उंच उंच चुनखडक आहेत. जर्मनीतील बस्तेई येथील हे खडक जमिनीपासून साधारण १९४ मीटर उंच आहेत. १० लाख वर्षांपूर्वी पाण्याच्या क्षरण प्रक्रियेमुळे खडकांना हे रूप प्राप्त झाले. या खडकांखाली इल्बे नदी वाहते. साधारण २०० वर्षांपासून हे खडक पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत. १८२४ मध्ये लाकडी पुलाद्वारे असे अनेक खडक परस्परांना जोडले गेले. १८५१ मध्ये लाकडी पुलाच्या जागी चुनखडीचा पूल बांधण्यात आला, १६८ वर्षांनंतर तो आजही दिमाखात उभा आहे.

Trending