आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यानेच जिंकली होती जगातील सर्वात मोठी लॉटली, पण हा पैसा ठरला त्याच्या उध्वस्त होण्याचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका - ही गोष्ट आहे जगातील सर्वात मोठी लॉटरी जिंकणाऱ्या एका व्यक्तीची आणि त्याच्या उध्वस्त झालेल्या आयुष्याची. वेस्ट व्हर्जिनिया मध्ये राहणाऱ्या जॅक वाइटेकरला २००२ साली २४० मिलियन पौंड म्हणजेच जवळपास २ हजार कोटी रुपयांची लॉटरी लागली होती.

 

अमेरिकेत पूर्वीपासून लॉटरीचा कल आहे. येथे लोक कधीतरी नशीब उजळेल या आशेने लॉटरीची तिकिटे विकत घेतात. त्याच आशेने जॅक वाइटेकर यांनी तिकीट खरेदी केले आणि त्यांना लॉटरी लागली. त्यांच्या कुटुंबासाठी, हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते, अचानक बँक खात्यात कोट्यावधी रूपये जमा झाले. ते  जगातील कोणतीही वस्तू खरेदी करू शकत  होते. परंतु या कुटुंबाने हा विचार केला नव्हता की हाच पैसा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरेल. 

 

वाइटेकरने हा पैसा पॉवरबॉल लॉटरीतून जिंकला होता. मोठ्या लॉटरीची रक्कम जिंकल्यानंतर जॅक वाइटेकरने  खूप प्रसिद्धी मिळवली. सर्व वृत्तपत्रात त्याच्याच बातम्या झळकू लागल्या त्याचेच फोटो दिसू लागले. संपूर्ण शहरभर त्यांची ओळख निर्माण झाली. प्रसिद्धी मिळत गेली. 

 

वाइटेकरने उत्सव साजरा करायला सुरवात केली. लॉटरीतून मिळालेल्या पैश्यानंतर तो एवढा आनंदी झाला होता कि, त्याने एका महिलेला बांगला खरेदी करून दिला.  ही महिला दुसरी कोणी नसून जिच्या दुकानातून त्याने लॉटरीचे तिकिट खरेदी केले ती होती. 
 
जास्त संपत्तीच्या अभिमानात वाइटेकरचा झाला नाश 
वाइटेकरकडे अचानक एवढा पैसे आला होता. त्यामुळे त्याचे बौद्धीक संतुलन बिघडत चालले होते. तो दारूच्या अधीन जाऊ लागला.  नेहमी मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये जाऊन शहरातील नामवंत लोकांसोबत नियमित उठबस करू लागला. सुरुवातीला त्याचा स्वभाव अतिशय मृदू होता, पण पैश्यांच्या गर्वाने त्याला वेडे केले. तो पबमध्ये आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना त्याचे ऐकण्याचे आदेश देत असे. जोरजोरात ओरडून सर्वांना सांगत असे की, देवापेक्षाही अधिक संपत्ती माझ्याकडे आहे. 

 

पैश्यांनीच निर्माण केल्या समस्या 
एक दिवस हॉटेलमध्ये आपल्या मित्रांबरोबर दारू पित बसलेला असतांना काही चोरट्यांनी त्याच्या गाडीवर हल्ला केला. त्यांना माहित होते की, संपत्तीच्या नशेत धुंद जॅक आपल्या गाडीत नियमित जास्तीत जास्त रक्कम घेऊन फिरत असतो.  चोरट्यांनी गाडीची काच फोडून त्यातून मोठी सुटकेस लंपास केली. त्यामध्ये जवळपास ३ कोटी एवढी रक्कम ठेवलेली होती.   
 
हरवलेली मुलगी सापडली मृत अवस्थेत 
संपत्ती आणि पैशांमुळे जॅकच्या मुलीचे खूप मित्र बनले होते. सगळे मित्र पैशामुळे जवळ आल्याने तिची घुसमट होत होती. तिला एकही जीवलग मित्र नव्हता. 2003 साली त्याची मुलगी अचानक कुठेतरी निघून गेली.  जेंव्हा ती सापडली तेंव्हा ती मृत अवस्थेत होती.  मुलीच्या मृत्त्यूनंतर जॅकचा वाईट काळ सुरू झाला. ज्या बारमध्ये तो जात होता तेथील व्यवस्थापकानेच त्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला. हा सर्व प्रकार होतो न होतो तोच त्याचे त्याचे बँक खाते कोणीतरी हॅक करून कोट्यवधी रूपये लंपास केले. जॅक जेवढ्या वेगाने धनाढ्य बनत गेला त्याच वेगाने उध्वस्त ही झाला. कालांतराने त्याच्या कुटुंबातील आणखी दोन व्यक्ती मृत अवस्थेत आढळले.  

 

बातम्या आणखी आहेत...