आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॉप करिअरमुळे अध्यात्माकडे वळाली होती तनुश्री, अनेक वर्षे राहिली आश्रमात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. तनुश्री दत्ता सध्या चर्चेत आहे. तिने अभिनेते नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तिने बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात केली. तनुश्रीने आरोप लावला की, जवळपास 10 वर्षांपुर्वी हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत छेडछाड करण्यात आली होती. तिला चुकीच्या पध्दतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला होता. तब्बल 10 वर्षांनंतर तनुश्रीने हे प्रकरण समोर आणले आहे. 2008 ते 2018 या काळात तनुश्री कुठे होते, हे तुम्हाला माहिती आहे का?

 

करिअरमध्ये अपयश 
तनुश्रीने 2004 मध्ये मिस इंडिया यूनिवर्सचा किताब जिंकला होता. याच वर्षी तिने आशिक बनाया आपने चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती चॉकलेट, करीबः राइवल्स इन लव, ढोल, रिस्क, गुड बॉय, बॅड बॉय आणि स्पीड अशा चित्रपटांमध्ये दिसली. पण कोणताही चित्रपट पहिल्या चित्रपटाप्रमाणे चालू शकला नाही. फ्लॉप चित्रपटांमुळे तनुश्री बॉलिवूडमधून गायब झाली. ती शेवटच्यावेळी जग मुंद्राचा थ्रिलर चित्रपट अपार्टमेंटमध्ये दिसली होती. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता. 

 

आध्यात्माने दाखवला नवीन मार्ग 
चित्रपट सोडल्यानंतर तनुश्री आध्यात्माच्या मार्गाने गेली. यामुळे तिला अपयश आणि डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास मदत मिळाली. या दरम्यान तनुश्रीने भारताच्या अनेक आश्रमांमध्ये आश्रय घेतला होता. तिने कोइम्बतूर येथील जग्गी वासुदेव आश्रमात बराच काळ घालवला. लद्दाख यात्रे दरम्यान तिने आपले केस दान केले. एका मुलाखतीत तनुश्रीने लद्दाखमधील अनुभव सांगितले होते. ती म्हणाली होती की, बुद्दिष्ट मेडिटेशन सेंटरमध्ये तिला सिंपल ब्रीदिंग टेक्निनने खुप आराम मिळाला होता. स्ट्रेसमधून बाहेर येण्यास तिला खुप मदत मिळाली. तिला नवीन आयुष्य मिळाल्यासारखे वाटत होते. अनेक वर्ष असे आयुष्य जगल्यानंतर तनुश्री दोन वर्षांपुर्वी अमेरिकेत स्थायिक झाली. तिथेही ती अध्यात्माशी जोडलेली आहे. सेलिब्रिटी असल्यामुळे तिला यूएसमध्ये अनेक इव्हेंट्समध्ये सेलिब्रिटी गेस्ट, जज, परफॉर्मर आणि प्रेजेंटरच्या रुपात आमंत्रित केले जाते. दोन महिन्यांपुर्वी ती भारतात आली. 

बातम्या आणखी आहेत...