आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कंपनीने 20 वर्षांपूर्वीच चुकून लाँच केला होता 'न्यूड' कॅमेरा, परत मागवले हजारो Models

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरातील कंपन्या आपले प्रॉडक्ट खराब असल्याच्या तक्रारींमुळे ते ग्राहकांकडून परत मागवतात. परंतु, एक असाही प्रसंग आला जेव्हा एका कंपनीने आपल्या ग्राहकांना प्रॉडक्टमध्ये इतके आधुनिक तंत्रज्ञान दिले होते, की कंपनीला ते विकल्यानंतर परत मागवावे लागले होते. 1998 मध्ये जपानच्या सोनी कंपनीला आपले एक कॅमकार्डर (हॅन्डीकॅम व्हिडिओ कॅमेरा) मार्केटमधून परत मागवावे लागले होते. कारण, त्या कॅमेऱ्यात वादग्रस्त नाइटव्हिजन इन्फ्रारेड तंत्रज्ञान होते. या फीचरने हॅन्डीकॅम 717 सिरीजचे कॅम रात्रीच्या वेळी किंवा आंधारात सुद्धा स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ काढू शकत होते. पण, या तंत्रज्ञानाने कॅमेरा एक एक्सरे काढण्यास सक्षण डिव्हाइस बनले होते. या कॅमेऱ्याने कपड्यांच्या आर-पार दिसते ही बाब कळाल्यानंतर मार्केटमध्ये खळबळ उडाली. सोनीला याचा पत्ता लागला तेव्हा त्यांनी बाजारातून आपले 70 हजार कॅमेरे परत मागवले होते.


कसे काम करते इन्फ्रारेड?
- कॅमेऱ्यात इन्फ्रारेडच्या मदतीने दुसऱ्यांच्या कपड्यांच्या आरपार पाहणे शक्य आहे. अर्थात या कॅमेऱ्यात ते फीचर ऑन करून पाहिल्यास समोरील विवस्त्र दिसून येते. 
- प्रत्यक्षात काही गोष्टी इन्फ्रारेडला शोषूण घेतात. तर काही त्यास सक्षम नसल्याने इन्फ्रारेड किरणे त्याच्या आर-पार जातात. परिणामी स्विम सूट आणि कपड्यांमध्ये थांबलेली व्यक्ती या कॅमेऱ्यातून पाहणाऱ्याला विवस्त्र दिसून येते. 
- अमेरिकेच्या एबीसी न्यूजनुसार, 1998 मध्ये जेव्हा हे तंत्रज्ञान सामान्य लोकांच्या हाती लागले तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया समोर आली. माध्यमांनी हे वृत्त लावून धरल्याने सोनीला आपले 717 सिरीज कॅमकॉर्डर परत मागवावे लागले. यानंतर त्यातून हे फीचर काढून परत मार्केटमध्ये पाठवण्यात आले.


इन्फ्रारेड म्हणजे नेमके काय?
- इन्फ्रारेड जाणून घेण्यापूर्वी आपल्याला रंग समजून घ्यावे लागतील. जेव्हा सूर्यकिरण प्रिझ्ममधून बाहेर पडते. तेव्हा 7 रंग तयार होतात. सर्वात पहिला रंग असतो तो लाल आणि शेवटचा रंग असतो तो जांभळा. हे रंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आहेत. एक्स-रे मशीन सुद्धा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहर आहे. परंतु, आपल्याला त्याच लहरी दिसतात ज्यांच्या प्रती आपले डोळे संवेदनशील आहेत. 
- लाल रंगानंतर येणारा रंग हा इन्फ्रारेड लहर म्हणून ओळखला जातो. तसेच जांभळ्या रंगाच्या पूर्वी येणारा रंग हा अल्ट्रावॉयलेट वेव मानले जाते. ह्या दोन्ही लहरी आपल्याला दिसत नाहीत. कारण, त्या रंगांपूर्वी येणारे रंग आपल्या डोळ्यांच्या संवेदनशीलतेच्या परिमाणात बसत नाहीत. इन्फ्रारेड गॉगल आणि कॅमेरे आपल्या डोळ्यांना दृश्य Amplify करून दाखवतात. ज्यामुळे अंधारात सुद्धा चित्र स्पष्ट दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...