आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पेशल डेस्क- नवीन वर्षांची सुरूवात झाली आहे. या प्रसंगी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत का, कधी आणि कोणी केली न्यू इअर साजरी करण्याची सुरूवात.
- सांगितले जाते की, न्यू इअरची सुरूवात 4000 वर्षांपूर्वी झाली होती. रोमचे हुकूमशहा जूलियस सीजरने इसवीसन पूर्व 45 मध्ये संपूर्ण जगाला एक नवीन कॅलेंडर दिले, ज्याचे नाव जूलियन कॅलेंडर होते. त्यावेळस जगभरात पहिल्यांदा 1 जानेवारीला नवीन वर्ष मानण्यात आले. तेव्हापासून ख्रिश्चन धर्माचे लोक या दिवशी न्यू इअर साजरी करतात.
- ते जूलियस सीजर होते, ज्यांनी वर्षाला 12 महीने आणि 365 दिवस दिले. जूलियन कॅलेंडरला अंदाजे 1600 वर्षे वापरण्यात आले आहे. पण नंतर जूलियन कॅलेंडरच्या जागेवर ग्रेगोरियन कॅलेंडर आणले, ज्याला पोप ग्रेगारीने लागु केले होते. ते देखील जूलियन कॅलेंडरचे रुपांतरण आहे.
- तुम्ही हैराण व्हाल की, वेगवेगळ्या धर्मातील लोक वेगवेगळ्या दिवशी नववर्ष साजरी करतात. हिंदु नववर्षाची सुरूवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून साजरी करतात, ज्याला नव संवत्सर म्हणतात. मान्यता आहे की, ब्रम्हाने याच दिवशी सृष्टीची सुरूवात केली होती.इंग्रजी कॅलेंडरप्रमाने ही तिथी एप्रिलमध्ये येते.
- जैन धर्मात नववर्षाची सुरूवात दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापून होते. मान्यता आहे की, भगवान महावीरला दिवाळीच्या दिवशीच मोक्ष प्राप्ती झाली होती. त्यामुळे जैन धर्माचे लोक दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून नववर्ष साजरी करतात.
- पारशी धर्मतील लोक 19 ऑगस्टला नवरोजच्या रूपात नववर्ष साजरी करतात. माणले जाते कि, अंदाजे 3000 वर्षांपूर्वी शाह जमशेदजीने याच दिवशी नववर्षाची सुरूवात केली होती.
- शिख धर्मातील लोक वैशाखी पर्वाच्या रूपात नववर्ष साजरी करतात. इंग्रजी कॅलेडरनुसार, एप्रिलमध्ये वैशाखी साजरी केली जाते. शिख धर्मीय खुप उत्साहाने या धर्माला माणतात.
- मुस्लिम धर्मातील लोक मोहर्रमच्या पहिल्या तारखेपासून नवीव वर्षाची सुरूवात करतात, त्याला हिजरी म्हणतात. हिजरी कॅलेंडर सगळ्या मुस्लिम देशात वापरतात आणि जगभरातील सगळे मुस्लिम याच कॅलेंडरला माणतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.