आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 55 तरुणींना Cheat करणाऱ्या युवकाला अखेर अटक, या Tricks ने बनवायचा गर्लफ्रेंड्स; तपासात केले धक्कादायक खुलासे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - तरुणींशी मैत्री करणे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे आणि त्यानंतर त्यांच्या अब्रूसह कोट्यधींची लूट करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याने अशाच पद्धतीने एक-दोन नव्हे, तर तब्बल 55 तरुणींना गंडवले. पोलिसांनी आरोपीला छत्तिसगडमधून अटक केली. तत्पूर्वी तो नवी दिल्लीतील प्रताप नगर परिसरात राहत होता. मूळचा छत्तिसगडच्या दुर्ग येथील रहिवासी असलेल्या युवकाचे नाव राहुल असे आहे. एका तरुणीला त्याने 10.50 लाखांना गंडवले होते. तिला आपली फसवूक झाल्याचे कळले तेव्हा तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. कॉल डीटेल आणि लोकेशन ट्रेस केल्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. यानंतर राहुलने एकानंतर एक धक्कादायक खुलासे केले.

 

वय झालेल्या अविवाहित तरुणींना करायचा टार्गेट
पोलिस निरीक्षक सुरेश कुमार ध्रुव यांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपी राहुल अशाच मुलींना टार्गेट करायचा ज्यांचे वय अधिक आहे. त्यातही सर्वच तरुणी अविवाहित आणि करिअरच्या बाबतीत स्टेबल होत्या. बँक बॅलेन्स अधिक असलेल्या तरुणींच्या तो संपर्कात यायचा. यानंतर त्यांच्याशी मैत्री करून त्यांचा विश्वास जिंकून लग्नाचे अमीष देत होता. पोलिस तपासात तो तब्बल 55 तरुणींच्या सतत संपर्कात असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये त्या सर्वच तरुणींचे मेसेज, व्हॉट्सअॅप आणि फेसबूकसह इतर सोशल मीडियावरील चॅट आहेत. पोलिस तपासात त्याने या सर्वच 55 तरुणींकडून कुठल्याही बहाण्याने पैसे घेतल्याचे स्वीकारले. दोन दिवसांपूर्वीच बँकेत अधिकारी असलेल्या एका तरुणीने त्याची तक्रार पोलिसांत केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली.


बिझनेस लॉस आणि आईच्या आजारपणाचे बहाणे...
तपासात राहुलने सांगितले, की त्याने अनेक राज्यांमध्ये तरुणींशी मैत्री करून त्यांना गंडवले. यातील बहुतांश तरुणींशी त्याने मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून संवाद साधला होता. हळू-हळू मैत्री आणि लग्नाचे अमीष देऊन त्यांना आपल्या प्रेमात अडकवायचा. एकदा भावनिक नाते जुळल्यानंतर त्यांना आपल्या कथित बिझनेसमध्ये तोटा, आईचे आजारपण, बहिणीच्या लग्नाच्या समस्या आणि वडिलांचे किस्से अशा खोट्या कहाण्या सांगायचा. विविध प्रकारचे बहाणे करून तो या तरुणींकडून पैसे घेत होता.


Ladies vs Ricky Behl पाहून आली फसवणुकीची आयडिया
आरोपी राहुलने पोलिसांनी सांगितले, की त्याने अद्याप एकीशीही लग्न केलेले नाही. मॅट्रिमोनिअल साइट्सवरून तो मुलींचे प्रोफाईल शोधायचा आणि त्यांना टार्गेट करायचा. त्याला ही आयडिया रणवीर सिंहचा चित्रपट 'लेडीज वर्सेस रिकी बेहल' पाहून आली होती. यानंतरच त्याने विविध मॅट्रिमोनिअल साइट्सवर आपले प्रोफाईल तयार केले होते.


मुंबईतील तरुणीकडून घेतले 21 लाख
आरोपीने या मुलींकडून आतापर्यंत कोट्यधी रुपये वसूल केले आहे. मुंबईच्या कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या तरुणीकडून त्याने सर्वाधिक 21 लाख रुपये घेतले आहेत. चौकशीत त्याने पोलिसांनी त्या सर्वच 55 तरुणींची नावे, पत्ता आणि फोन नंबर लिहून दिले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने तरुणींना इमोशनल ब्लॅकमेल करून ही लूट केली. त्याची सविस्तर चौकशी केली जात असून आणखी काही पीडित तरुणी समोर येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...