आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • This Man Made Out 2 Crore Rupees By Selling Flip flops Featuring Donald Trump\'s Tweets

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोनाल्ड ट्रंपच्या ट्वीटने बदलले या व्यक्तीचे नशीब, केले असे काम की झाली 2 कोटी रूपयांची कमाई, या कामाने त्याला केले अमेरीकेत फेमस...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिकेत राहणाऱ्या या व्यक्तीला डोनाल्ड ट्रंपमुळे एका महिन्यात 2 कोटी रूपयांचा फायदा झाला. त्याने ट्रंपच्या विवादित ट्वीट्सना कमाईच्या वेगळ्या प्रकारात बदलले. लॉस एंजिलिसमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय फोटोग्राफर आणि आर्टिस्ट सॅम मॉरिसनने ट्रंपच्या ट्वीट्सवाले फ्लिप-फ्लॉप्स (Flip-flops) बनवून विकले आणि फक्त 1 महिन्यात 2 कोटींची कमाई झाली.

 
सॅमने मागच्या सप्टेंबर 2017 मध्ये ट्रंपच्या दुट्टपी भुमीकेला लोकांच्या समोर आणण्यासाठी एक वेगळा मार्ग शोधला. त्याने साध्या चपला बनवल्या आणि त्यावर ट्रंपचे ट्विट असलेले स्टीकर लावले. त्याने अश्या 1 हजार चपला बनवल्या आणि त्यांना आपल्या वेबसाइट PresidentFlipFlops.com वर विकले. या वेगळ्या आयडियाला लोकांपर्यंत पोहण्यास उशीर नाही लागला. अनेक माध्यमांनी त्याला लोकांसमोर आणले आणि पाहता-पाहता त्याची सगळी चपले विकल्या गेली.


सहा ट्विटने बदलले आयुष्य
सॅमने ट्रंपच्या विवादित ट्विट्सपैकी दो-दो ट्विट्सचे तीन सेट्स तयार केले. प्रत्येक ट्विट परस्पर विरोधी होते. म्हणजेच ट्रंपने एका ट्विटमध्ये एक गोष्ट म्हणाले तर दुसऱ्यामध्ये दुसरे काही. सॅमने दोन्ही ट्विट्सना चपलांवर लावले आणि त्यांना वेगवेगळ्या साइजमध्ये तयार करून घेतले. 


ट्रंपच्या हिपोक्रेसीला समोर आणयचे आहे
या पूर्ण प्रोजेक्टच्या मागे डोनाल्ड ट्रंपच्या हिपोक्रेसीला सगळ्यांसमोर आणण्यायचे असल्याचे सॅमने सांगितले. दुट्टपी भुमिकेतील ट्रंप नेहमी लोकांच्या निशाण्यावर आले आहेत.