आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैद्राबादच्या प्राध्यापकांनी प्लास्टिकपासून बनवले पेट्रोल, किंमत 40 रूपये प्रति लीटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वाढत्या तंत्रज्ञानासोबत लोकांचे जीव दिवसेंदिवस बदलत आहे. पण त्यात पर्यावरणाची सुरक्षा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यावरणाला वाचवण्यासाठी प्लास्टिकला रिसायकल केले जात आहे. प्लास्टिकपासून अनेक उपयोगी वस्तु बनवल्या जात आहेत. हैदराबादच्या एका प्राध्यापकाने जे बनवले, त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत. हैदराबादचे रहिवासी असलेले 45 वर्षीय प्राध्यापक सतीश कुमार यांनी प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याचा कारनामा करून दाखवला आहे. प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याच्या या प्रक्रियेला त्यांनी पायरोलीसिस असे नाव दिले आहे.

 

सतीश कुमारने हायड्रोक्सी प्रायवेट लिमिटेड नावाने कंपनी बनवली आहे. जी अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत रजिस्टर आहे. सतीश यांचे म्हणने आहे की, प्लास्टिक पायरोलीसिस प्रक्रियेच्या मदतीने प्लास्टिकपासून डीझेल, एविएशन फ्यूल आणि पेट्रोल बनवले जाऊ शकते. अंदाजे 500 किलो रिसायकलेबल प्लास्टीक पासून 400 लिटर पेट्रोलचे उत्पादन केले जाऊ शकते. त्यांनी सांगितले की, ही एक सोपी प्रक्रिया आहे आणि यात पाण्याचा उपयोगही होत नाही आणि या प्रक्रियेतून घाण पाणीही बाहेर पडत नाही. तसेच ही प्रक्रिया हवेला दुषितही करत नाही.


सतीश कुमार यांनी 2016 पासून आतापर्यंत 50 टन प्लास्टिकला पेट्रोलमध्ये बदलले आहे. ते अशा प्लास्टिकचा उपयोग करतात, ज्याला परत उपयोगात आणले जाऊ शकत नाही. सतीशची कंपनी प्रतिदीन 200 किलो प्लास्टिकपासून 200 लिटर पेट्रोल बनवत आहे. सतीश बनवलेल्या पेट्रोलला स्थानीक उद्योगांना 40 ते 50 रूपये प्रति लीटर दराने विकत आहेत. या पेट्रोलचा वापर गाड्यांमध्ये केला जाऊ शकतो का नाही, याचा प्रयोग होणे बाकी आहे.