आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indore News, This Person 1100 Crore Scams, Scams Planning On Traveling In Auto,Indore, Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10वी पास व्यक्तीने ऑटोत फिरत असताना केली 1100 कोटींच्या घोटाळ्याची प्लॅनिंग, 400 व्यवसायिक सापडले अडचणीत...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर- मध्यप्रदेश सहित पाच राज्यात समोर आलेली 1100 कोटींच्या खोट्या इनपूट टॅक्स क्रडिट घोटाळ्याची गोष्ट हैराण करणारी आहे. फक्त इंदुरमध्येच 47 खोट्या कंपन्या बनवून 193 कोटींचा व्यवसाय दाखवणारा मुंबईचा जगदीश कनानी खुप चलाख होता. खोट्या कंपनीतून जारी करण्यात आलेल्या बीलमुळे 400 व्यवसायींकाना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तपासानंतर त्यांच्याकडून टॅक्सचोरीची 34 कोटी रक्कम वसुल केली जाईल.


अशा रितीने करत होता खोटे काम
सेंट्रल जीएसटी आणि वाणिज्यिककर विभागाच्या समोर आले की, फक्त 10वीपर्यंत शिकलेला कनानी मुंबईवरून इंदुरला आला आणि ऑटोत शहरातील मंदीरात फिरू लागला, त्याच वेळेस त्याने घोट्याळ्याची प्लॅनिंग केली. प्रवासादरम्यान त्याने मित्र मुकेश कटवासच्या ऑटोमध्ये आपल्या मित्रासोबत दिवसभर मंदीरांचे दर्शन घेत फिरला. प्रवासादरम्यान त्याने कटवासला जाळ्यात फासले आणि म्हणाला की, त्याने तर त्यांचे विज बील आणि इतर कागदपत्रे त्याला दिले तर तो जर महिना त्याला 3 हजार रूपये देईल. कटवासने त्याला आपले सगळे डॉक्टूमेट्स दिले आणि कनानीने आपल्या ई-मेल अॅड्रेसवरून औपचारिकता पूर्ण करून  पूजा ट्रेडर्स कंपनी राजनगर एक्सटेंशन पत्यावर रजिस्टर्ड करून घेतली. त्यानंतर कनानीने कटवासला अजून एक बील उपलब्ध करून देण्याचे म्हणला आणि त्याने त्याचा नातेवाईक मनीष कटवासचे बील दिले. त्याच्यावर श्याम ट्रेडर्स नावाने खोटी कंपनी स्थापन केली. याप्रकारे 40 खोट्या कंपन्या स्थापन करून 190 कोटींची व्यवसाय त्याने केला आणि यातून 34 कोटींची टॅक्स चोरी करण्यात आली.


खोट्या कंपन्यांच्या जोरावर घेतला क्लेम
अडचणीत अडकलेले 400 पेक्षा जास्त व्यवसायीक, ज्यांनी चलाख कनानीच्या खोट्या कंपनीच्या बीलांचा उपयोग केला आणि नंतर सरकारकडून याबदल्यात इनपुट टॅक्स क्रेडिट(आईटीसी) क्लेम करून घेतले. सेंट्रल जीएसटी आणि वाणिज्यिक कर विभागाने या सगळ्या व्यवसायीकांच्या रिटर्न, व्यवसायाची तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे.