आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील हा व्यक्ती हळू हळू बनतोय दगड, एका मच्छरामुळे अशाप्रकारे उध्वस्त झाले याचे जीवन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - पाकिस्तानात राहणाऱ्या या व्यक्तीला ज्यानेही पाहिले तो काही क्षणासाठी घाबरल्याशिवाय राहत वाही. या व्यक्तीचे पाय हत्तीसारखे झाले असून हळू हळू ते दगडासारखे बनत चालले आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी त्याला एक मच्छर चावला होता. त्यामुळे त्याची अशी अवस्था झाली आहे. 


डॉक्टरांनी सांगितले की, 38 वर्षांच्या शाहीद हुसेनला एलिफंटायसिस नावाचा आजार जाला आहे. एक मच्छर चावल्यामुळे त्याला हा आजार झाला आहे. एलिफंटायसिस हे एक पॅरासाइट इन्फेक्शन आहे. ते शरीरात जाताच मांसपेशींमध्ये मोठ्या प्रमाणावर सूज येते. त्यामुळे या आजाराला हत्तीच्या नावाशी जोडले जाते. डॉक्टरांनी सांगितले की, हे इन्फेक्शन एखाद्या संक्रमित मच्छराच्या चावल्यामुळे होते. 


पायांचे वजन 50 किलो 
या आजाराने शाहीदच्या पायावर अशाप्रकारची सूज आली आहे की, फक्त त्याच्या पायाचेच वजन 50 किलोपेक्षाही जास्त झाले आहे. त्यामुळे त्याला चालता फिरताही येत नाही. पाच मुलांचा पिता असलेला शाहीद म्हणाला, मी आनंदात जगत असतानाच माझे पाय सुजू लागले. मला वाटले साधीच सूज असेल पण आता मला पाय उचलताही येत नाही. 


पुढे वाचा, शाहीदला मिळत नाही उपचार.. 

 

बातम्या आणखी आहेत...