आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हव्वा कुनाची रं? हव्वा आपलीच रं! मल्टीस्टारर धुरळाचा टीझर रिलीज 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः काही दिवसांपासून सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक या हॅशटॅगने धुमाकूळ घातला होता. मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेल्या कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर  #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरला होता. सध्या महाराष्ट्रात तापलेल्या राजकारणामुळे कलाकारांनी हा हॅशटॅग वापरला की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर झी स्टुडिओजने हा हॅशटॅग आगामी चित्रपटासाठी असल्याचे सांगितल्यावर वातावरण शांत झाले होते. कलाकार ज्या चित्रपटाचे या अनोख्या पद्धतीने प्रमोशन करत होते, त्या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'धुरळा'.  


ग्रामीण भागातील राजकारणावर हा चित्रपट आधारित  असून नुकताच याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. निवडणुकीची रणधुमाळी, प्रचाराची लगबग, राजकीय शत्रुत्व, राजकारणात डोकावू पाहणारी तरुणाई असे राजकारणाचे विविध रंग एक मिनिटाच्या टीझरमध्ये दिसत आहेत. 

समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित 'धुरळा' चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतले अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र आले आहेत. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, उमेश कामत, अलका कुबल, सोनाली कुलकर्णी, सुलेखा तळवळकर, प्रियदर्शन जाधव या कलाकारांची फौज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'धुरळा' चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. हा चित्रपट नव्या वर्षात 3 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.