आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- ऑफीसमध्ये काम करणाऱ्या लोकांचे आयुष्य खुप संकुचित झाले आहे. 9 ते 10 तास काम केल्यावर आप्या शरिरात परिवारासाठी वेळ देण्याइतकी शक्ती राहत नाही. इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्या मेंटल हेल्थवर लक्ष देणे सोपे नसते. रिपोर्ट्सनुसार आज दर 5 पैकी 1 व्यक्ती डिप्रेशन म्हणजेच anxiety disorder (चिंता रोग) चा शिकार आहे. खासबाब म्हणजे 20 ते 40 वर्षातील युवक मेंटल डिसॉर्डर्सचा शिकार होत आहे.
वेळेच्या कमतरेतेमुले लोकांना आपल्या भावना आणि विचारांवर लक्ष देता येत नाही. फक्त irritation होत असते, ज्यांचा त्यांच्या नात्यांवर परिणाम पडतो. नवीन वर्ष सुरू झाले आहे. अनेक लोक वेगवेगळे रिजॉल्यूशन करतात. अशातच प्रत्येकाला असे रिजॉल्यूशन केले पाहिजे, की त्यांनी आपल्या मेंटल हेल्थवर लक्ष दिले पाहिजे.
मूड डिसॉर्डर आहे डिप्रेशन
डिप्रेशन एक प्रकारचा मनाचा आजार (mood disorder) आहे, ज्यात व्यक्तीच्या मनात नेगेटिविटी वाढते. अनेक वेळा लोक अशा परिस्थीत स्तब्ध होतात.
डिप्रेशनची लक्षणे
वेगवेगळ्या लोकांमध्ये डिप्रेशनची वेगवेगळी कारणे पाहायला मिळतात.
मानसिक लक्षण: अनेक दिवसांपासून दुखी, किंवा निगेटीव्ह वाटने. कामात लक्ष न लागणे, आवडीच्या कामतही मन न लागणे आणि आत्महत्येचा विचार येणे.
शारीरिक लक्षण: झोप न येणे भुक न लागणे, उर्जेची कमी, शरीरातील वेगवेगळ्या जागी त्रास, शारिरीक संबंधामध्ये मन न लागणे.
भावात्मक लक्षण: यांत व्यक्ती स्वत:ला एकटा किंवा विना कामाचा आहे असे वाटतो. कोणीच आपल्यावर प्रेम करत नाही किंवा कोणलाच मी आवडत नाही असे वाटणे.
प्रत्येक दुख: डिप्रेशन नसते
हे गरजेचे नाही की, प्रत्येत दुखी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल. एखादे छोटे दुख झाले तर त्याला डिप्रेशन म्हणता येत नाही. जेव्हा आपण अनेक दिवसांपर्यंत दुखी असु किंवा कोणत्याच कामात मन लागत नसेल आणि काहच कारावेसे वाटत नसेल आणि त्यामुळे आत्महत्येचा विचार येत असेल तर याला डिप्रेशन म्हणता येईल.
असा करा बचाव
डिप्रेशनपासून वाचण्यासठी स्वत:ला कामात बिझी ठेवा, आवडिचे काम करा आणि आनंदी राहा. यामुळे तुम्ही डिप्रेशपासून वाचु शकता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.