आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुंबन घेताना होऊ शकतो या व्यक्तीचा मृत्यू; विचित्र अॅलर्जीला सामोरे जाणाऱ्या युवकाची आपबिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अनेकजण त्यांच्या पहिल्या चुंबनासाठी आनंदी आणि उत्सुक असतात. परंतु, एक व्यक्ती असा आहे ज्याच्यासाठी चुंबन घेणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. ओली वेदरॉल (वय22) असे या व्यक्तीचे नाव असून तो सरी शहरात राहतो. त्याला एक दुर्मिळ अॅलर्जी झाली आहे. ही अॅलर्जी त्याच्यासाठी एक मोठी समस्या झाली आहे. या विचित्र अॅलर्जीमुळे त्याला बाहेर खाणेही कठिण झाले आहे. प्रवास करण्यासाठीही त्याला विचार करावा लागतो. एवढेच नव्हे, तर त्याला गर्लफ्रेंडजवळ जातानाही काळजी घ्यावी लागते.

 

शेंगदाण्यापासून अॅलर्जी

एका मुलाखतीत त्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याला शेंगदाण्याची अॅलर्जी झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या अॅलर्जीने वेदरॉलची थुंकी घट्ट झाल्याने त्याला श्वास घेणेही कठिण झाले. अलर्जीबद्दल समजले तेव्हापासून वेदरॉलचे अख्खे आयुष्यच बदलले. एकदा त्याने पीनट बटर खाल्ले होते तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. 

 

समोरच्या व्यक्तीने शेंगदाण्याचे पदार्थ खाल्ले तरी आहे धोका

वेदरॉलने शेंगदाणे खाणे सोडले होते. परंतु त्याला शेंगदाण्यापासून बनवलेले सगळेच पदार्थ सोडणे शक्य नाही. शेंगदाणे त्याच्यासाठी एवढे घातक झाले की तो कुणाचे चुंबनही घेऊ शकत नाही. कारण, समोरच्या व्यक्तीने शेंगदाणे किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्लेले असल्यास वेदरॉलचा मृत्यू होऊ शकतो. वेदरॉल सांगतो की, 'या अॅलर्जीमुळे अनेक लोकांचा जीवही गेला आहे. हा एक खुप मोठा धोका आहे. ही अॅलर्जी ज्या लोकांना नाही ते यामुळे होणाऱ्या धोक्याचा विचारही करु शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...