आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक किलो बटाटा आणि टमाट्याची किंमत तब्बल 50 लाख रूपये, जाणून घ्या कुठे मिळत आहे इतका भाव...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- महागाईमुळे देशातील सगळे नागरीक त्रस्त झाले आहेत. देशात हजारो असे गरीब लोक आहेत ज्यांना या महागाईमुळे दोन वेळचे जेवणदेखील मिळत नाहीये. महागाई ही देशातील एक गंभीर समस्या बनली आहे. पण आपण दक्षिण अमेरीकेतील देश वेनेझुएलाचा विचार करतोल तर आपल्याला आपल्या देशातील ही परिस्थीती चांगली वाटेल. 

 

वेनेझुएलाची करंसी बोलिवर आहे. येथील लोक एक किलो भाजी विकत घेण्यासाठी लाखो रूपये बोलिवर देतात. विश्वास बसत नाहीये ना ? पाहा तर मग.

 

येथे एक किलो बटाट्याची किंमत 20 लाक बोलिवर आहे.

एक किलो टमाटे 50 लाख बोलिवर
एक किलो गाजर 30 लाख बोलिवर
एक किलो पनीर 75 लाख बोलिवर
एक किलो तांदुळ 1 कोटी बोलिवर इतक्या महाग विकल्या जाते.

 

या सगळ्या किंमती पाहून तुम्ही अंदाज लावू शकतात की, त्या देशात महागाई किती असेल. महागाईमुळे तेथील लोक इतके त्रस्त आहेत की, देश सोडून जाणे त्यांच्यासाठी मोठी गोष्टी नाहीये. तेथील लोक कोलिंबिया, ब्राझील आणि इतर देशात पलायन करत आहेत.

 

तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, त्या देशात इतकी महागाई का आहे ? वेनेझुएलामध्ये या आर्थिक संकटाचे कारण जागतील स्तरावर कमी झालेल्या कच्च्या तेलाच्या किमती आहेत. तेथील सरकारने गरजेपेक्षा जास्त करंसी छापली त्यामुळे त्यांची किंमत कमी झाली.

 

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे तेथील नागरीकांना गरिबांसारखे जिवन जगावे लागत आहे. वेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी इतर देशांकडून मदत मागत आहेत.

बातम्या आणखी आहेत...