Home | National | Other State | This place in India is full of Platinum

येथे जमिनीखाली दडला आहे अब्जावधींचा खजिना, सरकारने ठरवले तर होईल अनेक राज्यांचा कायापालट...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 10:42 AM IST

सोन्याहून महागडी वस्तू आहे या जमिनीखाली, फक्त एका गोष्टीची आहे भीती!

 • This place in India is full of Platinum

  झारखंड- निसर्गात आपल्या गरजा भागवणाऱ्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. परंतु काही गोष्टी अशाही आहेत, ज्यांची किंमत अमाप आहे. अशीच एक माहिती झारखंडच्या जमशेदपूरमधून समोर आली आहे. या ठिकाणच्या जमिनीत सोन्यापेक्षाही मौल्यवान धातूचे भंडार असल्याचे सांगितले जात आहे.

  या नैसर्गिक खजिन्याच्या जोरावर भारत सरकारला देशाचा कायापालट करता येईल असेही सांगण्यात येते. परंतु जमिनीतून हे निसर्गाचे धन काढण्यासाठी काही अडचणीही समोर आहेत.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, कोणता खजिना आहे या जमिनीखाली...

 • This place in India is full of Platinum

  मिळालेल्या माहितीनुसार जमशेदपूमध्ये दमलाजवळ प्लॅटिनमचे भांडार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या परिसरात अंदाजे 100 वर्ग किलोमीटरच्या मैदानात, डोंगरावर आणि जंगलात प्लॅटिनम असल्याची शक्यता आहे. जर ही गोष्ट खरी निघाली तर भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधार येईल. महत्त्वाची बाब म्हणजे झारखंड खनिजे असलेला प्रदेश आहे. येथे या आधीही सिमडेगाच्या कुरडेग आणि चाईसबाबामध्ये प्लॅटिनम असल्याचे संकेत मिळाले आहेत.

   

 • This place in India is full of Platinum

  पण एक मोठी समस्या आहे
  झारखंडची सगळ्यात मोठी समस्या नक्सलवाद आहे. येथील अनेक परिसर एक तर नक्सलवाद्यांचे आहेत किंवा त्याठिकाणी नक्सलवाद्यांचे नियम चालतात. त्यामुळे या परिसरात जाण्यापूर्वी पोलिसांनाही विचार करावा लागतो, तर मग शास्त्रज्ञ येथे कसे जाणार. 

   

  विदेशात आहे प्लॅटिनमचा खजिना
  सगळ्यात महाग धातुंमधले एक प्लॅटिनम अमेरीका, रशीया, कॅनडा, झिंब्मावे आणि दक्षिण अफ्रिकेसाऱख्या देशात मोठ्या प्रमानात प्लॅटिनम उपलब्ध आहे. तर भारतात झारखंड आधी ओडिसा, तमिळनाडु आणि कर्नाटकमध्ये प्लॅटिनम मिळाले आहे. खास बाब म्हणजे लवकरच ओडसातील क्योंझोर जिल्ह्यात याची पहिली खाण सुरू होणार आहे.

Trending