आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - खून करणाऱ्यांना जन्मठेप किंवा मृत्यूदंड असा जवळपास प्रत्येक देशातील नियम आहे. परंतु, एक असाही देश आहे, जेथे मर्डर करणाऱ्यांना सरकारने केवळ परवानगीच दिली नाही तर त्यांना यासाठी पुरस्कृतही केले जाते. आम्ही फिलिपाइन्सबद्दल बोलत आहोत. या देशात राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी अमली पदार्थ तस्कर आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी त्यांना चक्क रस्त्यांवर ठार मारण्याचे आदेश जारी केले. केवळ पोलिसच नव्हे, तर सामान्य नागरिकांच्याही हातात बंदूका देऊन त्यांना तस्करांना ठार मारण्याची खुली सूट दिली. परिणामी राष्ट्राध्यक्षांनी आदेश काढल्याच्या अवघ्या 4 महिन्यांत 3500 अमली पदार्थाशी संबंधित गुन्हेगार आणि टोळ्यांचे सदस्य ठार मारण्यात आले. दिवसेंदिवस मृतांची संख्या अशी वाढली की गल्लो-गल्लीत मृतदेहांचा खच झाला.
प्रत्येक मर्डरसाठी 7000 रुपयांचे बक्षीस
फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी काढलेल्या आदेशावर जगभरात टीका झाली. अनेक मानवाधिकार संघटनांनी या निर्णयास अमानवीय अत्याचार आणि नरसंहार ठरवण्याची मागणी केली. United Nations ने सुद्धा या आदेशाला मानवाधिकारांचे उल्लंघन ठरवले आहे. दुतेर्ते यांनी नव्या नियमात अमली पदार्थ तस्करांना ठार मारणाऱ्यांना रोख बक्षीसही देण्यास सुरुवात केली. एका तस्कराला किंवा गुन्हेगाराला ठार मारण्याच्या बदल्यात या देशात प्रत्येकी 100 अमेरिकन डॉलरचे (7000 रुपये) बक्षीस दिले जात आहे. या आदेशाने घाबरून आतापर्यंत अमली पदार्थांच्या गुन्हेगारीशी संबंधित 70 हजारांहून अधिक आरोपी पोलिसांना शरण आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, दुतेर्ते यांनी पोलिसांना सुद्धा कुठल्याही अमली पदार्थ तस्करावर कायदेशीर कारवाई करू नये असे फरमान काढले आहेत. अर्थातच अधिकाऱ्यांना ड्रग माफिया दिसताच गोळ्या घालण्यास सांगितले होते. या कारवायांमध्ये अनेक निर्दोष सुद्धा मारले गेल्याचे आरोप झाले. परंतु, सरकारने सर्व प्रकारचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.