आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • This Sale Could Be Amazon's Last Sales Before New ECommerce Policy Comes Into Force

Amazon ची ही असेल शेवटची सेल, यानंतर नाही मिळणाल ऑफर्स आणि डिस्काउंटचा फायदा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे Amazon Great Indian Sale. कंपनीचा हा शेवटचा सेल असू शकतो. सरकारच्या नवीन ई-कॉमर्स नियमांमुळे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या याप्रकारचे सेल नाही लावू शकणार. यामुळे आता ग्राहकांना ऑफर्स किंवा डिसकाउंट्स मिळणार नाहीत. सरकारचे हे नवीन नियम 1 फेब्रुवारीपासून लागु होणार आहेत. यामुळेच Amazon ने सरकारी नियमांच्या डेडलाइनपूर्वीच आपल्या शेवटच्या सेलची घोषण केली आहे. 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या 4 दिवसांच्या सेलमध्ये तुम्हाला Apple, OnePlus, Xiaomi, Honor, Realme, Samsung आणि 10.or सारखे स्मार्टफोन्स स्वस्त दरात मिळणार आहेत.

 
या ब्रँड्सवर मिळेल डिस्काउंट
या सेलमध्ये Puma, Red Tape, Bata, MotherCare, Vero Moda, Fastrack, Joyalukkas, Times, Skybags, Arrow, LG, Voltas, BPL, HP, Canon, Philips सारख्या मोठ्या ब्रँडवर सुट मिळेल त्याशिवाय स्मार्टफोन, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, होम अँड किचिन, लार्ज अप्लायंसेज, डेली एसेंशियल्जसारख्या अनेक प्रोटक्टना कमी दरात खरेदी करू शकता.


अमेझॉनच्या ब्रँड्सवर मिळतील खास ऑफर्स
अमेझॉनचे आपले ब्रँड जसे Amazonbasics, Solimo, Symbol, Myx, Vedaka, Presto वर खास ऑफर्स मिळतील. अमेझॉनच्या Amazon Echo, FireTV Stick आणि Kindle डिवाइसेजवर ग्राहकांना 3000 रूपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल.


हँडलूम आणि हँडीक्राफ्टवर देखील मिलेल सुट
या सेलमध्ये देशभरातील हँडलूम आणि हँडीक्राफ्टवर देखील सुट मिळणार आहे. यात इकत, बनारसी, टांटच्या साड्या आग्र्याचे बुटदेखील असणार आहेत. यांत महिलांसाठी ग्रोसरी आणि मेकअपच्या सामानावरही सुट देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...