आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ट्रान्सपोर्ट अथॉरिटीमधील दलालांना बसणार चाप, हे सॉफ्टवेअरची ठेवणार दलालांवर नजर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : परिवहन प्राधिकरण एकमात्र अशी जागा ज्याठिकाणा दलालांची घुसकोरी असते. दलालांची ही घुसखोरीमुळे परिवहन प्राधिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. यासाठी ब्लू प्रिंटवर काम सुरु झाले आहे. यामध्ये नवीन परिवहन प्राधिकरण बनवणे, नवीन जागेवर ते हलविणे आणि सर्व प्रकारच्या सुविधा ऑनलाइन करण्याचे सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रान्सपोर्ट अथॉरिटीमध्ये एक नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. यामध्ये जे दलाल असतील त्यांची ओळख होण्यास मदत होणार आहे. 

 

हे सॉफ्टवेअर अशाप्रकारे करणार काम  

मीडिया रिपोर्ट्च्या मते, नवीन परिवहन प्राधिकरण मार्चपर्यंत तयार होणार आहे. तर जनकपुरी अथॉरिटीला हरि नगममध्ये हलविण्याचा विचार आहे. तेथे नवीन ऑफीस तयार करण्यात येणार आहे. वसंत विहार अथॉरिटीचे नवीन ऑफिस लाडो सराय येथे तयार होणार आहे. या सर्व अथॉरिटीजला अपग्रेड करण्यात येणार आहे. साउइ झोन येथील सेंट्रल ऑफिस राजघाटजवळ उभारण्यात येणार आहे. यामुळे करोल बाग, झंडेवालान भागातील लोकांना फायदा होईल. या सॉफ्टवेअरच्या मदतीने दलालांच्या आयपी अॅड्रेसला ब्लॉक केले जाईल. यासाठी दिल्लीतील सर्व एमएलओ कार्यालयांमध्ये टच स्क्रीन कियोस्क देखील लावण्यात येणार आहे. 

 

टेस्ट पास झाल्यानंतर लगेच मिळणार परवाना
परिवहन प्राधिकरणातील रांगेची कटकट बंद करण्यासाठी टोकन पद्धत लागू करण्यात येणार आहे. कार्यालयात गेल्यावर कोणत्या सर्विससाठी कोठे अर्ज करायचा हे सांगण्यासाठी प्रत्येक कार्यालयात एक हेल्प डेस्क असणार आहे. लर्निंग लायसंससाठी टच स्क्रीनवर परीक्षा द्यावी लागणार आहे. टेस्ट पास झाल्यानंतर लगेच लायसंस देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक एमएलओ ऑफिसमध्ये महिलांसाठी वेगळा कक्ष असणार आहे. 


ड्रायव्हिंग लायसंसला करणार अपग्रेड

ड्रायव्हिंग लायसंस आणि आरसी कार्ड आता लवकर खराब होणार नाही. कारण आता कार्डची क्वॉलिटी सुधारण्यात येणार आहे. यामध्ये नवीन फीचर्स जोडण्यात येणार आहे. तसेच ट्रांसपोर्ट सर्टिफिकेटमध्ये ऑनलाइन स्वाक्षरीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...