आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीमियरपूर्वीच झाला खुलासा, हे तीन कन्टेस्टंट सर्वात पहिले जातील बिग बॉसच्या घरात 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आज 'बिग बॉस 13' शोचा प्रीमियर होणार आहे आणि ते 13 चेहरे समोर येणार आहेत जे यावेळी 'बिग बॉस' च्या घरात राहण्यासाठी येणार आहेत. यादरम्यान शोचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये घरात जाणारे पहिले तीन चेहरे समोर आले आहेत. खास गोष्ट ही आहे की, हे तिन्ही टीव्ही सीरियल्सचे प्रसिद्ध कलाकार आहेत. 'बिग बॉस' च्या ट्विटर अकाउंटवरून दोन प्रोमो व्हिडिओ पोस्ट केले गेले आहेत. यांचे सर्वांचे नाव तर लिहिलेले नाही पण चेहरे मात्र थोडे थोडे ओळखायला येत आहेत. एका व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शुक्ला तर इतर दोन व्हिडीओजमध्ये रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्य या कॅटेस्टन्ट म्हणून दिसत आहेत.  

एक प्रोमो व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे, 'ही सून दाखवणार आहे आपला सेक्सी अंदाज.' तसेच दुसरा व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'प्रत्येक मुलीच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी येत आहे हा हॉट हॅण्डसम मुलगा.' यापूर्वीदेखील 'बिग बॉस' च्या ट्विटर अकाउंटहून एक व्हिडिओ पोस्ट केला गेला होता. ज्यामध्ये देवोलीना भट्टाचार्य दिसली होती.