आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा विश्वविजेत्याचा २८ काेटींच्या बक्षिसाने गाैरव; आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आयसीसीच्या आयसीसीच्या यंदाच्या वनडे वर्ल्डकमधील चॅम्पियन संघावर काेट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव हाेणार आहे. यंदा विश्वविजेता ठरलेल्या संघाचा २८ काेटींचे बक्षीस देऊन ट्राॅफीसह गाैरव करण्यात येईल. आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासामधील ही सर्वाधिक रक्कम असल्याचे दिसून येते. गत स्पर्धेदरम्यान बक्षिसाची ही रक्कम २६ काेटी रुपये हाेती. मात्र, यंदा या बक्षिसांच्या रकमेचा आकडा वाढवण्यात आला आहे.  म्हणजेच २०१५ च्या विश्वविजेत्या टीमला मिळालेल्या बक्षिसांपेक्षा यंदाच्या चॅम्पियनला मिळणाऱ्या रक्कमेत ८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली.  २०१५ मध्ये १४ संघ सहभागी झाले हाेते. यंदा १० संघ आपले काैशल्य पणास लावणार आहेत. चार संघ कमी झाल्याने बक्षिसांच्या रक्कमेत वाढ करण्यात आली. 


आयसीसीने यंदा विश्वचषकातील विजेत्या संघांना ७० काेटींचे बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. ही स्पर्धा १४ जुलैपर्यंत इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे.  

उपविजेता संघाला १४ काेटी
यंदाच्या  स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ हा १४ काेटींच्या बक्षिसाचा मानकरी ठरणार आहे. २०१५ वेळी ही रक्कम १२ काेटी हाेती. यामध्ये आता तीन काेटींनी वाढ करण्यात आली.  तसेच उपांत्य फेरीतील पराभूत चारही संघ हे प्रत्येकी साडेपाच काेटींच्या बक्षिसांचे मानकरी ठरतील.  यंदा वर्ल्डकपमध्ये ४५ सामने हाेणार आहेत. 

 

२०११ मध्ये सर्वाधिक ४४ टक्यांनी वाढ
गत  तीन वर्ल्डकपचा तुलनात्मक अभ्यास केल्यास, २०११ मध्ये बक्षीस रक्कमेत ४४ टक्क्यांनी वाढ झाली हाेती. कारण, २००७ मध्ये ही रक्कम १६ काेटी हाेती. २०११ मध्ये यात वाढ करण्यात आली. त्यामुळे ही रक्कम २३ काेटींवर गेली.  त्यामुळे विजेता संघ हा २६ काेटींचा मानकरी ठरला हाेता. आता ही रक्कम वाढली आहे. त्यामुळे यंदा २०१९ मधील विश्वविजेता संघ हा २८ काेटींचे बक्षीस घेऊन जाणार आहे.  उपविजेत्याला १४ काेटी मिळतील. 


१९७५ मधील विजेत्यास अवघ्या ४ लाखांचा मान 
पहिला वर्ल्डकप १९७५ मध्ये खेळवण्यात आला हाेता. या स्पर्धेतील विजेत्या संघाला बक्षिसाच्या स्वरूपामध्ये अवघे ४ लाख रुपये मिळाले हाेते. या स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी आठ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे चॅम्पियन विंडीजचा संघ ४ लाखांचा मानकरी ठरला हाेता. या स्पर्धेत आठ संघांमध्ये १५ सामने झाले. न्यूझीलंडच्या टर्नरने सर्वाधिक १७१ धावा काढल्या हाेत्या. विंडीजने फायनलमध्ये १७ धावांनी आॅस्ट्रेलियावर मात केली हाेती

 

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची वर्ल्ड वाॅरमधील जवानांना श्रद्धांजली

ऑस्ट्रेलिया टीमचे खेळाडू वर्ल्डकप पुर्वी तुर्की येथील गालीपाेली येथे दाखल झाले.  याठिकाणी या सर्व खेळाडूंनी पहिल्या युद्धात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.  अाम्ही काेणत्याही प्रकारच्या माेठ्या इव्हेंटला जाण्याअाधी याठिकाणी येताे. येथे अाम्हाला वेगळी प्रेरणा मिळते, अशी गाेलंदाज कमिन्सने प्रतिक्रीया दिली. 

बातम्या आणखी आहेत...