आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकता कपूरच्या शोमध्ये बनले होते दीर-वहिनी, लग्नाविना गेल्या 15 वर्षांपासून निभावत आहेत एकमेकांची साथ, प्रेमाच्या बळावर टिकले आहे दोघांचे नाते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकता कपूरच्या 'क्योकी सांस भी कभी बहू थी' या मालिकेत (2000-2008) मध्ये दीर-वहिनीचा रोल करणारे संदीप बसवाना आणि आश्लेषा सावंत हे गेल्या 15 वर्षांपासून लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. लिव-इनच्या इतक्या वर्षानंतरही त्यांचा लग्नाचा कोणताच विचार नाही. कुठल्याही बंधनाविना हे आजही एकमेकांसोबत खूश आहेत. 

 

एकेकाळी संदीपपासून दूर राहण्याचा सल्ला द्यायचे लोक..
- एका मुलाखतीदरम्यान आश्लेषाने सांगितले की, लहान गावातून चित्रपटसृष्टीत आल्याने सर्वच जण तिला संदीपपासून दूर राहण्याचा सल्ला देत असत. अनेक तासांच्या शूटिंग शेड्यूलमुळे हे दोघे आले जवळ.

 

एक दिवस आश्लेषा आली आणि परत गेलीच नाही..
- सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढत संदीप म्हणाला, आम्ही अगोदर खूप चांगले मित्र होतो. एक दिवस ती घरी आली आणि नंतर परत गेली नाही. आजही आम्ही कुठल्याही वचन-शपथ आणि प्रेमाच्या आणाभाका यांपासून दूर आहोत आणि एकमेकांसोबत खूश आहोत.


15 वर्षानंतरही लग्नाचा कोणताच प्लान नाही..
-  2017 मध्ये जेव्हा संदीपला त्याच्या लग्नाच्या प्लानविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, मी एका स्टेबल फॅमिलीमधून आहे आणि लग्नाच्या 40 वर्षानंतरही माझ्या आईवडिलांना खूश पाहिले आहे. पण मी खराब नातेसंबंध आणि खोटे लग्नही पाहिले आहेत ज्यात दोघे सोबत का राहत आहेत हे माहीत नाही. यासाठी आम्ही असे ठरविले आहे की जोपर्यंत एकमेकांपासून खूश आहोत तोपर्यंतच सोबत राहू नाहीतर वेगळे होऊन जाऊ.
- नातेसंबंध तुमचे जीवन सोपे करतात. मी कधीच तिला मी तिच्यासोबत माझे पूर्ण आयुष्य घालवू इच्छितो असे म्हणणार नाही आणि तिनेसुद्धा सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या नाहीत. आम्ही जोपर्यंत एकमेकांसोबत खूश आहोत तोपर्यंत सोबत राहू नाहीतर वेगळे होऊन जाऊ.


आश्लेषा काय म्हणाली... 
- लग्नाचा विषय काढल्यावर आश्लेषा म्हणाली, "मला रजिस्ट्रेशन ऑफिस अथवा कोणत्याच पेपरची सिक्युरिटी म्हणून काहीच गरज नाही. सोबत राहणे हीच माझ्यासाठी नात्याची सुरक्षितता आहे असे मी मानते. टीनएज मध्ये असताना जेव्हा संदीपला भेटली होती तेव्हा इनसिक्युर होती पण आता नाही", असे आश्लेषा म्हणते. 

 

मुलांना जन्म देण्याअगोदर करणार लग्न..

- सध्या मुलांना जन्म देण्याचा कोणताही विचार नाही असे दोघांनी सांगितले आहे, पण भविष्यात याबाबतीत विचार करु शकतो. तर मुलांना जन्म देण्याचे ठरविले तर अगोदर लग्न करु असे दोघांनी सांगितले. आश्लेषा म्हणते, "कधी कधी मुलाला जन्म द्यावासा वाटतो जो संदीपसारखा दिसेल. पण जेव्हा जबाबदारीचा विचार येतो तेव्हा या गोष्टीचा विचार सोडून देते." 
- संदीप म्हणतो, "माझ्या घरात खूप लहान मुले आहेत पण मला अजून स्वतःचे मुल व्हावे असे वाटत नाही. जर आश्लेषाला वाटत असेल की ती मुलांशिवाय अपूर्ण आहे तर मी तिला नाही म्हणणार नाही. त्यावेळी मी तिला नाही म्हणणार नाही."


 'क्योंकि सास...' मध्ये असे होते दोघांचे नाते..
- 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत संदीपने गंगा (शिल्पा सकलानी) चा पती साहिलचा रोल केला होता. तर आश्लेषाने साहिलचा भाऊ (सुमित सचदेव) च्या पहिल्या पत्नीचा रोल केला होता. दोघांनी त्यानंतर कमल मालिकेतही काम केले. या मालिकेतही ते कपल नव्हते.
 

बातम्या आणखी आहेत...