आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलेने स्‍वत:च केली स्‍वत:ची प्रसूती, कारण ऐकून बसणार नाही विश्‍वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्राथा - ऑस्ट्रेलियात एका ३६ वर्षांच्या हिला महिलेने स्वत:च स्वत:ची प्रसूती करवून घेतली. व्यवसायाने परिचारिका असलेली कार्ले वालिकुआला नुकतीच तिसऱ्यांदा अाई बनली अाहे. जन्मणाऱ्या नवजाताला सर्वप्रथम अापला स्पर्श व्हावा, अशी तिची इच्छा हाेती.  त्यामुळे तिने हा निर्णय घेतला. ही प्रसूती नॉर्मल हाेऊ शकणार नाही, असे डाॅक्टरांनी तिला सांगितले; परंतु यामुळे कार्ले निराश झाली नाही. तिने सीझेरियनच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला.


तथापि, या सर्व प्रक्रियेवर डॉक्टरांनी निगराणी ठेवली हाेती. नवजात मुलगी गर्भाशयाच्या खालच्या भागापर्यंत अाल्यावर कार्लेनेच स्वत:च्या हातांनी तिला बाहेर काढले. यास अाईच्या मदतीने हाेणारी सीझेरियन प्रसूती म्हणतात. सध्या दाेघांची प्रकृती उत्तम अाहे. वैद्यकीय क्षेत्रात अाईच्या हातून नवजात अर्भकाला गर्भाशयाबाहेर काढण्याच्या या प्रक्रियेलाही एक प्रकारचे सीझेरियनच मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...