आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल साडी, लाल लिपस्टीक लावलेली ही महिला तुमच्या घरीदेखिल येऊ शकते, पण तुम्ही दार उघडले तर..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो

नवी दिल्ली - सुंदर चेहरा, लाल साडी आणि लाल लिपस्टीक लावलेली एखाद्या महिलेने रात्रीच्या वेळी तुमचे दार वाजवले किंवा सामसूम रस्त्यावर मदत मागितली तर तिला जराही मदत करू नका. कारण सुंदर दिसणाऱ्या या महिलेने अनेकांची घरे उध्वस्त केली आहेत. हिची सत्यता समजणाऱ्याला तर धक्काच बसतो. सोशल मीडियावरही तिची प्रचंड चर्चा आहे. सध्या ती दोन महिन्यांपासून फरार आहे. कधीही ती कोणालाही शिकार बनवू शकते. त्यामुळे लोक ही बातमी शेअर करून इतरांना सावध करत आहेत. 


राधे माँची भक्त 
ज्या अत्यंत चतूर महिलेबाबत आपण बोलत आहोत, तिचे नाव आहे, सपना. ही महिला राधे माँची भक्त होती अशीही माहिती मिळाली आहे. अगदी कमी वयाची असतानाच सपनाने गुन्हेगारी जगात पाऊल ठेवले होते. आतापर्यंत तिने तिघांशी लग्न केले आहे, त्यात एक तिच्या बहिणीचा नवरा होता, अशी माहिती मिळतेय. 


पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात पोहोचवले 
सपनाने तिच्या नवऱ्यावर बलात्काराचा आरोप केला होता, त्यानंतर तो सद्या तुरुंगात असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. अनेक गुंडाशी तिचे संबंध असल्याचे सांगितले जाते. ती अगदी सजून, शृंगार करून लोकांच्या घरी मदत मागायला जाते आणि त्यांना शिकार बनवते. 


पोलिसांचा शोध सुरू 
सपनावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ती दोन महिन्यांपासून फरार आहे. पोलिस आणि क्राइम ब्रँच तिचा शोध घेत आहेत. या महिलेने मार्च महिन्यात एअरपोर्ट रोडवरील बिग बॉस रिसॉर्टमध्ये छत्तीसगडमधील माहिती अधिकारी जे श्रीनिवास यांचे वडील नरसिम्हा राव आणि मुकेश यांच्या यांचे वडील आदित्य यांना बंदी बनवून ठेवले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...