आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न-पाण्याविना 30 वर्षांपासून फक्त चहावर जिवंत आहे ही महिला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरिया(छत्तीसगढ)- येथे बरदिया नावाचे एक गाव आहे. या गावात पिल्ली देवी नावाची एक महिला राहते. एका रिपोर्टनुसार पिल्ली देवी यांनी मागील 30 वर्षांपासून अन्न-पाणी सोडले आहे. त्या फक्त चहा पितात, आणि तोही एक कप चहा. पिल्ली 12 वर्षांच्या असताना त्यांनी अन्न सोडले होते आणि त्या फक्त रोज एक कप चहावर जगतात. 


पिल्ली देवी म्हणाल्या
'मला भुक लागत नाही, जेवणाचे मन करत नाही. मला फक्त चहा प्यायला आवडतो आणि मला बाकी काही माहित नाहीत पण मला भुक लागत नाही. मी फक्त दिवसभरातून एक कप चहा पिते. डॉक्टरांनी मला जेवण करण्यास सांगितले आहे पण मला भुक लागत नाही.'

 

बरदिया गावातील लोक पिल्ली देवी यांना 'चाय वाली चाची' म्हणतात. पिल्ली देवीचे वडील रति राम यांनी सांगितले की, पिल्ली जेव्ही 6 वीत होत्या तेव्हापासून त्यांनी जेवण सोडले आहे. पिल्ली 6 वीत असताना डिस्ट्रिक्ट लेव्हल टूर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी गेली होती, आणि तिकडून परत आल्यापासून तिने खाणे सोडले.'

 

पिल्ली देवी सुरूवातील दुध पित होत्या, आणि त्यासोबत एक-दोन बिस्कीट किंवा ब्रेड खात होत्या पण हळू-हळू त्यांनी चहा पिणे सुरू केले. खास बाब म्हणजे त्या फक्त काळा चहा पितात म्हणजे विना दुधाचा चहा पितात, ते पण फक्त एक कप संध्याकाळी.


पिल्लीच्या भावाने सांगितले की, पिल्लीच्या या त्रासाबद्दल अनेक डॉक्टरांना दाखवले पण कोणाकडेही काही उपाय नव्हता. पिल्ली कधीतरीच घराबाहेर जातात आणि त्या भगवान शंकराची पुजा करतात.


कोरिया जिल्हा रूग्णालयातील डॉ. एस.के गुप्ता यांनी सांगितले की, कोणत्याही व्यक्तीसाठी फक्त चहावर जिवंत राहणे अवघड आहे. शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर फक्त चहावर एखादा व्यक्ती 33 वर्षे जिवंत नाही राहू शकत. हे त्यांच्यासाठीही खुप शॉकींग आहे.

बातम्या आणखी आहेत...