आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या वर्षीही पीए पीएफवर 8.55% व्याजदर शक्य; ईपीएफओच्या संचालक बैठकीत होणार निर्णय 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवृत्तीधारकांची संघटना ईपीएफओ पीएफ जमावरील व्याजदर २०१८-१९ साठी ८.५५ टक्के कायम ठेवण्याची शक्यता आहे. मागील वर्षीदेखील पीएफ जमावर इतकेच व्याज मिळाले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)चे सहा कोटी पेक्षा जास्त भागधारक आहेत. एका उच्चपदस्थ सूत्राने सोमवारी ही माहिती दिली. 

 

त्यांनी सांगितले की, ईपीएफओच्या केंद्रीय संचालक मंडळाची (सीबीटी) पुढील बैठक २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामध्ये ईपीएफओच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. यामध्ये पीएफ जमावरील व्याजदराच्या प्रस्तावाचा ही समावेश आहे. सूत्राने सांगितले की, लोकसभा निवडणुका पाहता चालू आर्थिक वर्षासाठी व्याजदर २०१७-१८ च्या समान ८.५५ टक्क्यांवर कायम ठेवले जातील. मात्र, व्याजदर ८.५५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्याची शक्यताही नाकारता येणार आहे. 

 

कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सीबीटी ईपीएफओचे निर्णय घेणारे मंडळ आहे. चालू आर्थिक वर्षासाठी पीएफ जमावरील व्याजदराला अंतरिम स्वरूप या माध्यमातूनच दिले जाते. सीबीटीने मंजुरी दिल्यानंतर यावर अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीची आवश्यकता असते. त्यानंतर ईपीएफओ पीएफच्या जमा रकमेवरील व्याज भागधारकांच्या खात्यात टाकते. 

 

सीबीटीच्या बैठकीत ज्या इतर मुद्द्यांवर विचार केला जाऊ शकतो. त्यामध्ये, नवीन फंड मॅनेजरची नियुक्ती आणि ईपीएफओच्या वतीने ईटीएफमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा आढावा यांचा समावेश आहे. ईपीएफओने ऑगस्ट २०१६ पासून ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. सध्या एकूण गुंतवणुकीच्या १५ टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवली जाते. ईपीएफओने ईटीएफमध्ये सुमारे ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...