आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा विधानसभा निवडणुकीत चार पोलिस अधिकारी उतरले रिंगणात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीलेश अमृतकर 

नाशिक - पाेलिस दलात राहून मंत्र्यांचा प्राेटाेकाॅल व सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सामाजीक जाणीव म्हणून आणि एकूणच आमदार, खासदार व मंत्र्यांचा थाटबाट बघून राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा हाेते. त्यातूनच अनेक अधिकाऱ्यांनी सेवेत असतानाच आपली विचारधारा पक्की केल्याने त्याच राजकीय पक्षाची वाट धरतात. यात, मुंबईचे पाेलिस आयुक्त सत्यपालसिंग यांनी राजीनामा देत लाेकसभेत उमेदवारी केली आणि त्यात निवडून आले आणि मंत्रीही झाले. त्यांचाच कित्ता गिरविण्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणूकीत तब्बल बाराहून अधिक अधिकारी रिंगणात  उतरले. मात्र, प्रत्यक्षात ५ माजी पाेलिस अधिकारी माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

लाेकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी शासनाच्या अनेक खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेतकरी, अभियंत्यासह उच्चशिक्षीत मंडळीही  राजकारणात प्रवेश करून निवडणूक लढविताना दिसून येतात. यानिवडणूकीच्या रणांगणापासून पोलीस दलातील अधिकारीसुद्धा यातून सुटले नाहीत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व सत्यपाल सिंग यांच्या यशस्वीततेनंतर यंदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण ४ माजी पोलिस अधिकारी वेगवेगळ्या पक्षातर्फे निवडणूक लढवून आपलं नशिब आजमावत आहेत. यामध्ये माजी पोलीस अधिकारी एनकांऊटर फेम प्रदीप शर्मा, निवृत्त सहायक आयुक्त समशेर पठाण, माजी पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड व पाेलिस अधिकारी राजेश पाडवी हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

विधानसभेची आचारसंहिता लागताच एनकांऊटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना नालासोपारा मतदारसंघाकडून  उमेदवारी मिळवली. त्याचबरोबर मुंबई पोलीस दलात एसीपी म्हणून कर्तव्य बजावलेले समशेर पठाण हे मुंबादेवी मतदारसंघातून व वरळी  मतदारसंघातून माजी पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड या दाेघांना वंचित बहूजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. त्यापाठाेपाठ नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा मतदारसंघातून भाजपाकडून पाेलिस खात्यातून स्वच्छेानिवृत्ती घेतलेले राजेश पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाडवी यांचे वडील उद्देसिंग पाडवी हे या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार होते. त्यांच्याच जागी आता राजेश पाडवी लढत आहेत. मुंबईतील माजी उपआयुक्त सुदेश पाडवी यांचे पुतणे असलेले राजेश पाडवी यांनी निवृत्तीला ८ वर्षे शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून आखाड्यात उतरले आहे. विशेष म्हणजे,वर्षानुवर्ष राजकारण्यांवर लक्ष ठेवून खाकीचा धाक निर्माण करणाऱ्या पाेलिस अधिकाऱ्यांना राजकारणात मतदार स्विकारतील का? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
 

वरिष्ठांनीही लढवली निवडणूक 
मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त वाय.सी.पवार, टी.के. चाैधरी यांच्यासह गृह विभागात प्रधान सचिव पदावर पाेहचललेले आयपीएस अधिकारी प्रेमकिशन जैन यांनी निवृत्तीच्या आधीच राजीनामा देऊन रिपाइं आठवले गटात प्रवेश करून निवडणूक लढविण्याची तयारी केली. नंदूरबारचे माजी पाेलिस अधीक्षक डाॅ. संजय अपरांती यांनी २०१४ मध्ये रायगड लाेकसभा मतदारसंघातून व त्यांनतर २०१९च्या निवडणूकीत धुळे मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीकडून उमेदवारी केली. पाेलिस दलाची सेवा पाच वर्ष शिल्लक असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली हाेती. तसेच, रायगड मतदारसंघातून यंदा लाेकसभेसाठी माजी पाेलिस अधीक्षक साेळंकी यांनी बसपाच्या तिकीटीवर निवडणूक लढविली. मात्र, याठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून आले. सत्यपालसिंग यांचा अपवाद वगळता एकाही पाेलिस अधिकाऱ्याला यश आले नाही. 

बातम्या आणखी आहेत...