आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा अयोध्येत भव्य दिवाळी, त्रेता युगातील दृश्य; ५ देशांतील रामायण मंडळी, ३.२१ लाख दिवे उजळण्याचा होईल विक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - रामाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अयोध्येत या वेळी दिवाळी सणात त्रेता युगाचे दृश्य साकारण्यात येणार आहे. प्रभू श्रीरामचंद्र लंकेवर विजय मिळवून अयोध्येत येतील व त्यांचा दरबार भरेल. त्याचबरोबर देशभरातील नामवंत चित्रकार अयोध्येस राममय  करण्यासाठी त्रेता युगातील प्रसंग भिंतीवर आणि इमारतीवर साकारतील. लोकांसमोर त्रेता युगाचा काळ जिवंत करण्यासाठी शोभायात्रेपासून दिवाळीपर्यंतचे सर्व प्रसंग रामलीला, भजन व नृत्य नाटिकांतून सादर केले जातील. तसेच ३ लाख २१ हजार दिव्यांनी शहर उजळवून टाकण्याचा नवा विश्वविक्रम करण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर २४ ते २५ ऑक्टोबरदरम्यान सलग तीन दिवस एक हजारांहून अधिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. पाच देशांतील रामलीलेचा सर्वात खास कार्यक्रम असेल हे याचे वैशिष्ट्य अाहे. मॉरिशस, थायलंड, इंडोनेशिया, सुरीनाम, नेपाळ येथील रामायण मंडळीतील कलाकार आपल्या देशातील शैलीत रामलीला सादर करतील.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून थायलंडचे महाराजा वजिरा लोंगकान उपस्थित राहतील. दीपोत्सव पर्व आकर्षक करण्यासाठी या वर्षी गुप्तारघाटपासून भरतकुंडापर्यंत १२ ठिकाणी रामलीला, भजन, नृत्य नाटिकांचे सादरीकरण होणार आहे. विविध ठिकाणे यात्रेप्रमाणे सजवण्यात येत आहेत. गेल्या वर्षी दीपोत्सवाचा कार्यक्रम रामाच्या पेडीवरच केंद्रित करून आयोजित केला होता. परंतु या वेळी संपूर्ण अयोध्यानगरीत  हा कार्यक्रम होईल. गुप्तारघाटपासून  १२ किमी दूर असलेल्या भरताच्या तपस्थळी म्हणजे नंदीग्रामपर्यंत दीपोत्सव साजरा होईल. 
 

३२ मोठे देखावे : अयोध्येतील प्रत्येक घर  व मंदिर दिव्याने उजळे
अयोध्या शहरात तीन दिवस घराघरांतून दिवे लावण्याचे आवाहन केले जाणार आहे. ३२ मोठे देखावे आणि १२ ठिकाणी होणारे कार्यक्रमसुद्धा रामकथेवर आधारित असतील. आयुक्त मनोज मिश्रा यांनी म्हटले, तीन दिवसांच्या या समारोहात दोन नवे विश्वविक्रम होतील. अयोध्या रामासाठी १० ऑक्टोबरपर्यंत सजवण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...