आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशातील यावर्षीचे मोठे तारे...

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शिखर : पर्यावरणावर मुलीचे यूएनमध्ये आव्हान - महाशक्तींनो, 'हाऊ डेअर यू?'

२ डिसंेबर : पर्यावरणाबाबत जगाला आव्हान देणारी १६ वर्षांची ग्रेटा थनबर्ग टाइम पर्सन ऑफ द इअर झाली. थनबर्गने यूएनमध्ये सर्व देशांच्या नेत्यांना सांगितले- हाऊ डेअर यू? तुम्ही धोका दिला, तुम्हाला युवा पिढी माफ करणार नाही.

विक्रम : ३४ वर्षीय सना मरिन जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान

१५ डिसेंबर : फिनलंड च्या ३४ वर्षांच्या सना मरिन जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान झाल्या. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंदा अर्डर्न ३९ वर्षे, युक्रेनचे पीएम ओलेक्सी ३५ वर्षे आणि उ. कोरियाचे प्रमुख किम जोंग उन देखील ३५ वर्षांचे आहेत.

हॅट‌्ट्रिक: शेख हसीना यांनी सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली, चौथ्यांदा पंतप्रधान

८ जानेवारी : बांग्लादेश मध्ये शेख हसीना यांनी निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा बहुमत प्राप्त केले. चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या. हसीनांच्या अवामी लीग आघाडीने ३०० पैकी २६० जागा जिंकल्या. वनडे संघाचे कर्णधार मुर्तजाही जिंकले.

स्वप्नांची शक्ती : मुलींच्या नेतृत्वाची बाजू मांडत जोजिबिनी झाली मिस युनिव्हर्स

९ डिसेंबर : दक्षिण अाफ्रिकेची जोजिबिनी टुन्जी मिस युनिव्हर्स झाली. टुन्जी एका उत्तरात म्हणाली- प्रत्येक मुलीने आपल्या स्वप्नाच्या शक्तीवर विश्वास ठेवावा. मुलींना नेतृत्व शिकवणे आवश्यक.

बातम्या आणखी आहेत...