आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नागपुरातून यंदा काँग्रेसचा सरप्राइज उमेदवार

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात अडकवून ठेवता यावे यासाठी यंदा तगडा उमेदवार देणार असून ते सरप्राइज असेल, अशी घोषणा काँग्रेसच्या वतीने शनिवारी नागपुरात करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठी तीन ते चार उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू असून लवकरच ते सरप्राइज उघड केले जाईल, असेही काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाही दक्षिण-पश्चिममधूनच लढण्याची घोषणा केली असून त्या दृष्टीने भाजपच्या वतीने तयारी सुरू आहे. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुडधे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तीन ते चार नावांवर चर्चा सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्यापैकी एक नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वतीने हे सरप्राइज असेल, असाही त्यांचा दावा आहे. 
 

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार : थोरात
सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जनतेत प्रचंड असंतोष असल्याने परिवर्तन होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात व्यक्त केला.

0