आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall: हिच्या चेहऱ्यावर जाऊ नका; या सुंदर तरुणीने केले असे काम, पोलिसही चक्रावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - या तरुणीच्या चेहऱ्याकडे पाहून ती असेही कृत्य करू शकते यावर कुणाला विश्वास बसणार नाही. मेरठच्या नौचंडी परिसरात एका रेडिमेड गारमेंटच्या शोरूममध्ये तिला चोरी करताना दुकानदारांनी रंगेहाथ पकडले. पकडल्यावर अगोदर युवतीने स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगून सीन क्रिएट केला. तसेच आपणच पीडित आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र तिने नरमाईने घेतले.


असे आहे प्रकरण...
- मेरठच्या जागृती विहारमध्ये विशाल यांचे रेडीमेड गारमेंटचे शोरूम आहे. विशाल म्हणाले की, मागच्या 27 जुलैला एक तरुणी आमच्या शॉपवर कपडे खरेदी करायला आली होती. आम्ही तिला एकामागे एक कपडे दाखवत होतो आणि ती नजर चुकवून महागडे कपडे पार करत होती. 
- नंतर म्हणाली - मला यातले कोणतेही पसंत नाहीये. आणि ती शॉपमधून बाहेर गेली. ती गेल्यावर जेव्हा आम्ही कपडे गोळा केले तेव्हा कळले की ती कपडे चोरून पसार झालीये. 
- ती पकडली जावी म्हणून आम्ही दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील तिची फुटेज पोलिसांना दिली.
- गढ रोडवर माझ्या परिचिताचे गारमेंट शॉप आहे. बुधवारी त्यांनी ती या शॉपमध्ये असल्याचे मला फोनवर सांगितले. मी लगेच तिथे पोहोचलो. ते म्हणाले की, ती जवळच्या दुकानात गेली आहे. मी इतर व्यापाऱ्यांना सोबत घेतले आणि त्या शॉपमधूनही या बहाद्दर महिलेला दोन ब्रँडेड शर्टांची चोरी करताना रंगेहाथ पकडले. 
- पकडल्यावर भोळेपणाचा आव आणून म्हणू लागली की, मी असे काहीच केलेले नाही. मला का त्रास देत आहात? आम्ही पोलिसांना बोलावल्यावर कुठे ती नरम झाली.
रुरकीची राहणारी आहे तरुणी
- नौचंडीचे पोलिस स्टेशन इन्चार्ज अर्जुन सिंह म्हणाले, तरुणीने आपले नाव नेहा, राहणार रुडकी असे सांगितले आहे. तिच्या सांगितलेल्या पत्त्यावर तपास केला जात आहे. तरुणीने आणखी दोन शोरूममधूनही कपडे चोरल्याची तक्रार आली आहे. यासंबंधी तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून तपासानंतर तरुणीविरोधात कारवाई होईल.


पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेचे आणखी फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...