आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- कुणी आले, कुणी गेले तरी काँग्रेस पक्षाला फरक पडणार नाही. पक्षाने अनेक चढउतार पाहिले आहेत. पक्षाचे सुप्तपणे काम सुरुच आहे. ते राज्याच्या पातळीवर काम करत आहेत. मी ही काम करत आहे. आम्ही एकत्रच आहोत. एकत्र नसतो तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आमच्याकडे आले असते का ? असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करत यापुढे आम्ही एकत्र फिरु, विखे यांचे नाव न घेता त्यांनी सोमवारी सांगितले.
सहकार सभागृहात वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी थोरात नगरमध्ये आले होते. त्यावेळी जिल्हा बँकेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर मला पक्षाने कामाची मोठी संधी दिली आहे. एखाद्या कार्यकर्त्याला मोठी संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहेत. पक्षाचे काम सुप्तपणे सुरु आहे. या निवडणुकीत बदल दिसेल. आम्ही एकत्रच आहोत.एकत्र नसतो तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आमच्याकडे आले असते का? असा सवाल थोरात यांनी केला. साखरेच्या दराबाबत सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस प्रभारी शहराध्यक्ष दीप चव्हाण यावेळी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.