Crime / ATM मध्ये पैसे भरणारे कर्मचारी करायचे चोरी, नंतर ते पैसे द्यायचे व्याजाने: पैसे परत मिळाल्यास ATM मध्ये करायचे जमा

ATM मधून 21 लाख रूपये चोरणाऱ्या आरोपींनी केला खुलासा
 

दिव्य मराठी वेब

Jun 18,2019 02:35:00 PM IST

इंदूर - तीन दिवसांपूर्वी परदेशीपुरा येथे आयटीआय कॅम्पसच्या बाहेरीत एटीएममधून चोरी झालेले 21 लाख रूपयांचा तपास लागला आहे. एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या एसआयएस कंपनीचे अंकित सोळंकी आणि विजय जिनवाल यांनी ही चोरी केली होती. ही चोरी त्यांनी कशाप्रकार केली याबाबत पोलिसांना सांगितले आहे.

यामुळे कर्मचाऱ्यांना मिळायची हिम्मत
दोघांनी पैसे एटीएममध्ये टाकण्यापूर्वीच त्यातील 10.5 लाख रूपये काढून घेतले होते. ते या पैशांना व्याजावर देत आपल्या कर्जाचे हप्ते जमा करत होते. त्यांच्याकडे पैसे परत आल्यानंतर ते पासवर्ड आणि चावीच्या मदतीने एटीएम भरत होते. बँकेचे अधिकारी मॉनिटरिंगमध्ये फक्त जमा झालेल्या पैशांची माहिती घेत होते. यामुळे कर्मचाऱ्यांना हा अपहार करण्यास सुट मिळत होती आणि यामुळे फसवणूक झाल्याचेही समजत नव्हते.

कमी वापरातील एटीएमला करायचे लक्ष
एएसपी प्रशांत चौबेंनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांकडे पैसै भरण्याच काम होते. दोघेही कमी वापरात असलेल्या एटीएमवर लक्ष साधत त्यातून पैसै काढून घेत मशीनमध्ये चुकीची माहिती भरत होते. संयोगितागंज आणि भंवरकुआं परिसरात असे प्रकरणे समोर आले आहेत. त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.


बँकेला या प्रकाराबाबत काहीही घेणं-देणं नाही
बँकेच्या बेजबाबदारीपणाचा फायदा कंपनीतील कर्मचारी घेत असतात. यासाठी हे कर्मचारी बँकेतील पैशांचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरत होते. दरम्यान बँकेतील हा पैसा काही महिन्यासांठी व्याजावर देऊन त्यासोबत कमाई करत होते. नंतर पैसे आल्यानंतर पासवर्ड आणि चावीच्या मदतीने सर्व पैसे एटीएममध्ये जमा करण्यात येत असल्याचे दोघांनी पोलिस चौकशीत सांगितले. दरम्यान या बेजबाबदारपणात बँकेला काहीही घेण-देण नव्हते. कारण बँक जो पैसा एटीएममध्ये जमा करत होती तो पैसा इंश्योर्ड राहत होता.


अशाप्रकारे उघडकीस आला प्रकार
या घटनेबाबत एफआयआर दाखल करण्यासाठी बँकेतील किंवा पैसे जमा करणाऱ्याकडून कोणीच आले नाही. दरम्यान कंपनीच्या एका कर्मचाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाबाबत विमा कंपन्या देखील मुग गिळून गप बसल्या आहेत. खरं तर अशा प्रकारच्या प्रकणांत विमा कंपन्याचेच नुकसान अधिक होते आणि हे नुकसान ते सामान्य नागरिकांकडून वसूल केले जाते.

X
COMMENT