आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसले आहेत; पवारांचा मोदींना टोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘निवडणुका होतील... निकाल लागत राहतील, मात्र सध्या जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसले आहेत. राजधानी दिल्ली सोडून त्यांनी हिमालयात जाणं पसंत केलं आहे,’ असा टाेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अायाेजित इफ्तार पार्टीत ते बाेलत हाेते.


‘आज देशात एक वेगळीच परिस्थिती आहे. देश कोणत्या वाटेवर जाईल, सत्ता कोणत्या विचारांच्या पक्षाची येईल हे स्पष्ट व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत,’ असेही पवार यांनी सांगितले. ‘प्रसारमाध्यमांनी देशात एक वेगळं वातावरण निर्माण केलं आहे. काही प्रसारमाध्यमे सत्ताधाऱ्यांच्या हातची बाहुली बनली आहेत,’ अशी टीकाही त्यांनी दिली. ‘मला रविवारपासून काही फोन येत आहेत. चिंता व्यक्त केली जात आहे, मात्र मी सगळ्यांना सांगतो आहे की घाबरू नका, दोन दिवसांतच सगळं चित्र स्पष्ट हाेईल.’ या इफ्तार पार्टीला सुनील तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित होते.

 

बंधुभाव राहील कसा?
आम्ही इथे बंधुभाव जपण्याचा संदेश देत आहोत, तर काही पक्षातले लोक वेगळाच विचार करताना दिसत आहेत. अशा लाेकांमुळे समाजातला बंधुभाव, एकता कशी टिकून राहील? देशात परिवर्तन घडेल यावर माझा विश्वास आहे. त्यासाठी मी अल्लाहकडे दुवा मागणार आहे,’ असेही शरद पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...