आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे लोक नाराज आहेत ते शिवसैनिक नाहीत; अब्दुल सत्तार यांच्या कथित राजीनाम्यानंतर संजय राउत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्तार यांना मोठा मान देऊन राज्यमंत्रिपद दिले
  • बाहेरून आलेल्यांना अॅडजस्ट व्हायला वेळ लागेल

मुंबई - अब्दुल सत्तार यांना मोठा मान देऊन शिवसेनेने राज्यमंत्रिपद दिले अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राउत यांनी दिली. अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेटमंत्रिपद न मिळाल्याने नाराज होऊन राजीनामा दिल्याचे शनिवारी समोर आले. त्यावर अधिकृत दुजोरा देण्यास तूर्तास राउत यांनी नकार दिला. तरीही शिवसेनेत बाहेरून आलेल्यांना अॅडजस्ट होण्यासाठी थोडासा वेळ लागेल असे राउत यांनी सांगितले आहे.

जे नाराज आहेत ते शिवसैनिक नाहीत -राउत

शिवसेना नेते संजय राउत यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी बोलताना राउत म्हणाले, "अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला की नाही हे उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कार्यालयाकडूनच सांगितले जाईल. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला जास्त मंत्रिपदे आलेली नाहीत. तरीही शिवसेनेने अब्दुल सत्तार यांना मोठा मान देऊन राज्यमंत्रिपद दिले. जे नाराज आहेत, ते शिवसैनिक नाहीत." असा टोला राउत यांनी लगावला आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी देखील तोफा धडाडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारला हा पहिला झटका आहे. हे सरकार जास्त वेळ टिकणार नाही याचेच हे संकेत असल्याचे भाजप नेत्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...