वंदे मातरम / 'जे लोक 'वंदे मातरम' म्हणू शकत नाहीत, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही'- केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी

'मोदींनी काश्मीरच्या जनतेला त्यांचा अधिकार दिला'

दिव्य मराठी वेब

Sep 22,2019 06:43:00 PM IST

भुवनेश्वर(ओडिसा)- बालासोरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यामुळे विरोध करत असलेल्या काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. शनिवारी जनजागरण सभेत सारंगी म्हणाले की, "भाजपच्या अनेक विरोधी पक्षांच्यी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर सरकारला समर्थन दिले, फक्त काँग्रेसच विरोध करत आहे. तसेच, पीओके आणि अक्साई चिनदेखील भारताचा भाग आहेत. त्यामुळे जे लोक वंदे मातरमला स्विकारू शकत नाहीत, त्यांना देशात राहण्याचा हक्क नाहीये."


सारंगी पुढे म्हणाले की, "कलम 370 रद्द केल्यामुळे तुकडे-तुकडे झालेली गँग आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांना याचे सर्वात जास्त दुखः होत आहे. काही लोक आहेत, जे केंद्राच्या या निर्णयाला चुकीचे सिद्ध करण्याचा मागे आहेत. पण, दुसरीकडे संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. काश्मीरमध्ये मानवाधिकार मुद्द्यावर बोलताना सारंगी म्हणाले की, काही लोक आता मानवाधिकारावर बोलत आहेत, पण जेव्हा काश्मीरमधील भारतीय सैनिकांना बॉम्बने मारण्यात आले, तेव्हा मानवधिकार कुठे गेला होता."

'मोदींनी काश्मीरच्या जनतेला त्यांचा अधिकार दिला'
सारंगी पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने 72 वर्षानंतर जम्मू-काश्मीरच्या जनतेला त्यांचा हक्क मिळवून दिला. सध्या काश्मीरमध्ये शांती असून, जमिनीची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. आता काश्मीरच्या मुली, इतर ठिकाणी आपल्या मर्जीने लग्न करू शकतील."

X
COMMENT