आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांना आपला मतदारसंघ सांभळता आला नाही, त्यांच्या जाण्याने भाजपला काहीच फरक पडणार नाही- संजय काकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'गोपीनाथ गडावर आलेले लोक मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी आले होते'

मुंबई- 'ज्या व्यक्तीला आपला मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्या असण्या-नसण्याने पक्षाला काहीच फरक पडणार नाही,' असा घणाघात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला. भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी 12 डिसेंबरला भगवानगडावर केलेल्या भाषणात महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे, उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. त्यावर खा. संजय काकडेंनी प्रतिक्रीया दिली.


भाजपचे दिवंगत नेते गोपीनथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने परळी येथील गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात पंकजा मुंडेनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीसांवर टीका केली. तसेच, मी पक्ष सोडणार नाही, पण पक्षाने मला सोडावं का नाही, हा त्यांच्या प्रश्न असल्याचे म्हटले. यावरुन संजय काकडे यांनी पंकजा मुंडेचा समाचार घेतला.

काकडे म्हणाले की, ''गेली पाच वर्षे पक्षाने मंत्रीपद दिले, जिल्ह्याच्या खासदार कुटुंबातली आहेत. तरीदेखील एखाद्या व्यक्तीला मत मिळाले नाही आणि त्याचा तब्बल 30 हजार मतांनी पराभव झाल्यास, हा पक्षाचा दोष नसून त्याचा स्वतःचा दोष आहे. मराठा, ओबीसी, मुस्लिम समाज त्यांच्यावर नाराज आहे, त्यामुळेच त्यांना मत मिळाले नाही. काल गोपीनाथ गडावर आलेले लोक हे गोपीनाथ मुंडेंच्या प्रेमापोटी आले होते.'' असे काकडे म्हणाले. तसेच, "चाळीस वर्षे राजकारणात असून ज्यांना स्वतःचा मतदारसंघ सांभळता आला नाही, त्यांच्यामुळे भाजपला काहीच फरक पडणार नाही," असा टोला लगावला.

बातम्या आणखी आहेत...